Dailyhunt
चौथीच्या वर्गात झालेल्या भांडणाचा ५० वर्षांनी घेतला बदला; दातच तोडले.

चौथीच्या वर्गात झालेल्या भांडणाचा ५० वर्षांनी घेतला बदला; दातच तोडले.

कासरगोड (केरळ) : शाळेत असताना चौथीच्या वर्गात झालेल्या भांडणाचा दोन मित्रांनी तब्बल ५० वर्षांनी बदला घेतला आहे. मित्रावर हल्ला करत त्याचे समोरचे २ दात तोडल्याची घटना कासरगोड येथे घडली आहे.

या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालोथु बालकृष्णन आणि मॅथ्यू नावाच्या मित्रांनी बाबू नावाच्या एका व्यक्तीवर हल्ला केला आहे. तपासात या आरोपींनी जुन्या घटनेचा बदला घेण्यासाठी ६२ वर्षीय बाबू यांच्यावर हल्ला केल्याचे पुढे आले. हे प्रकरण ५० वर्ष जुने आहे जेव्हा हे तिन्ही मित्र चौथीच्या वर्गात शिकायला होते. त्यावेळी बाबूने या आरोपींना मारहाण केली होती. त्या घटनेचा बदला ५० वर्षांनी बाबूला मारहाण करून घेण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेतील दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी ५० वर्ष जुन्या घटनेचा बदला घेण्यासाठी बाबूला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

तिघे मित्र २ जून रोजी भेटले होते, तेव्हा बालकृष्णन याने बाबू यांची कॉलर पकडली आणि मॅथ्यूने दगडाने बाबूच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर हल्ला केला. या हल्ल्यात बाबूचे समोरील २ दात तुटले. त्यानंतर बाबू यांना जखमी अवस्थेत कन्नूरच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेच्या काही दिवस आधी आरोपी आणि पीडित यांच्यात लहानपणी झालेल्या वादावर तोडगा काढला होता. परंतु २ जूनला आरोपींनी मागील घटनेचा हवाला देत चौथीच्या वर्गात मारहाण का केली होती म्हणून बाबूला मारहाण करत दात तोडले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! स्नेहसंमेलनामध्ये गाणं म्हणत असतानाच सर कोसळले अन्…

हृदयद्रावक! इंजिनिअरींगचे शिक्षण घेणाऱ्या युवतीचा तडफडून मृत्यू…

मुख्याध्यापक आणि शिक्षक एकाचवेळी शिक्षिकेच्या प्रेमात झाले वेडेपिसे अन्…

धक्कादायक! विद्यार्थिनीने शाळेतच दिला बाळाला जन्म अन् जाळले…

Video: पुणे शहरात ट्रकने महिलेला चिरडले; अपघाताची घटना CCTV मध्ये कैद…

The post चौथीच्या वर्गात झालेल्या भांडणाचा ५० वर्षांनी घेतला बदला; दातच तोडले… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka