Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धक्कादायक! विद्यार्थिनीने शाळेतच दिला बाळाला जन्म अन् जाळले.

धक्कादायक! विद्यार्थिनीने शाळेतच दिला बाळाला जन्म अन् जाळले.

भोपाळ (मध्य प्रदेश): सागर जिल्ह्यात एका सरकारी शाळेच्या मैदानात नवजात बाळाचे जळालेले शव ३ डिसेंबर रोजी सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे परिसरात संताप आणि गोंधळ निर्माण झाला आहे.

पोलिसांनी तपास केल्यानंतर अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.

शाळेतील एका 16 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीने 2 डिसेंबर रोजी बाळाला जन्म दिला. जन्मानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने तिची तपासणी केली होती, तेव्हा बाळ सुखरूप होते. जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी या बाळाचे जळालेले शव शाळेच्या मैदानात सापडले. या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि तपास पथक घटनास्थळी पोहोचले. शाळेतील कर्मचारी वर्गाची चौकशी करण्यात आली असून CCTV फुटेज ताब्यात घेण्यात आले आहेत. पुरावे गोळा केल्यानंतर बाळाचं शव पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहे.

मुलीच्या आईने गर्भावस्थेबाबात काहीच माहित नसल्याचे सांगितले. अल्पवयीन मुलगी बराच काळ शाळेत गैरहजर होती आणि केवळ प्रसूती वेदना जाणवायला लागल्यानंतर ती शाळेत परतली होती. पोलिसांनी या प्रकरणात मुलीच्या काकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे. पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे शाळा आणि परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे. नवजात बाळाच्या जळलेल्या अवस्थेतील मृतदेहामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून या घटनेच्या सखोल तपासाची मागणी होत आहे.

धक्कादायक! चुलत्याने केला अल्पवयीन पुतणीवर अत्याचार, पीडितेने दिला बाळाला जन्म…

प्रियकराची वाट पाहून आलाच नाही; अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म…

हनीमूनच्या दुसऱ्याच दुसऱ्याच दिवशी नवरीने दिला बाळ जन्म…

यूट्यूब व्हिडिओ पाहून प्रसुती करायला गेला अन्…

The post धक्कादायक! विद्यार्थिनीने शाळेतच दिला बाळाला जन्म अन् जाळले… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka