Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Cyber Crime! पुणे शहरात सायबर फ्रॉडचे मोठे रॅकेट उघडकीस.

Cyber Crime! पुणे शहरात सायबर फ्रॉडचे मोठे रॅकेट उघडकीस.

पुणे: पुणे शहरातील खराडी परिसरात सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. दीडशे ते दोनशे पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांसह ही कारवाई करण्यात आली आहे.

खराडी-मुंढवा बायपास रस्त्यावर प्राईड आयकॉन नावाच्या इमारतीमधून हे बनावट कॉलसेंटर चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यामध्ये कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या अनेक युवक-युवतींना ताब्यात घेण्यात आले आहे.

'पुणे गणपती डायरी २०२५-२६'ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

खराडी-मुंढवा बायपास रस्त्यावर प्राईड आयकॉन नावाच्या इमारत आहे. या इमारतीमधून हे बनावट कॉलसेंटर चालविले जात असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या छाप्यानंतर सायबर फ्रॉडचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पुण्यातील मॅग्नेटल बीपीएस अँड कन्सल्टन्सी एलएलपी हे कॉल सेंटर आहे. पोलिसांनी छाप्यामध्ये अनेक महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. अनेक लोकांची चौकशी सुरू आहे. तर पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे रॅकेट अमेरिकेतील लोकांना फसवायचे अशी माहिती समोर आली आहे. सायबरचा मोठा फ्रॉड होत होता अशी माहिती समोर आली आहे. या छाप्यात 41 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. लॅपटॉपमधील अनेक महत्त्वाचा डाटा सायबर पोलिसांनी जप्त केला आहे. अमेरिकेमधील लोकांना फसवून डिजिटल अटक करण्याच्या नावाखाली फसवायचे आणि पैसे मागायचे अशी माहिती समोर आली आहे.
सायबर पोलीसांनी 61 लॅपटॉप जप्त केले आहेत. शंभर ते दीडशे लोक काम करत असल्याची माहिती आहे. सर्व गुजरातचे असून मुख्य आरोपी देखील गुजरातचा असल्याची माहिती आहे. खराडीतील गुजरातच्या लोकांचा कॉल सेंटर सायबर पोलिसांनी उध्वस्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

पुणे शहरात बनावट नोटा छापणा-या टोळीचा सायबर पथकाकडून पर्दाफाश…

सायबर मर्डर! पुण्यातील उद्योगपतीचं पटना एअरपोर्टवरून अपहरण अन् हत्या…

Cyber Crime! पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारे ताब्यात…

Cyber Crime! पोलिसकाकाच्या खात्यातून 2.3 लाख गायब; कसे गेले पाहा…

Cyber Crime! युवतीला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण अन्…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka