Dailyhunt
धक्कादायक! भारतात फिरायला आलेल्या स्पॅनिश महिलेवर सामुहिक बलात्कार.

धक्कादायक! भारतात फिरायला आलेल्या स्पॅनिश महिलेवर सामुहिक बलात्कार.

रांची (झारखंड) : स्पेनमधून भारतात पर्यटनासाठी आलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना झारखंड येथील दुमका जिल्ह्यात घडली आहे. आरोपींनी या महिलेला मारहाण करत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील हंसडीहा पोलिस स्टेशन हद्दीतील कुरुमाहाट येथे एका स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्पेनमधून आलेली एक महिला आणि एक पुरुष पर्यटक भारतात पर्यटनासाठी दोन वेगवेगळ्या बाईक्सवरून निघाले होते. संध्याकाळची वेळ असल्याने दोघेही हंसडीहा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुरमाहाटजवळ विश्रांतीसाठी थांबले होते. रात्री उशिरा 10 वाजण्याच्या सुमारास 7 ते 8 युवक तिथे पोहोचले. सर्वात आधी त्यांनी महिलेला मारहाण केली आणि नंतर महिलेवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेत दोघेही पर्यटक जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रात्री घटनास्थळ गाठून दोघांनाही सरैयाहाट सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल केले. महिलेवर उपचार सुरू आहेत. सरैयाहाट रुग्णालयाबाहेर सुरक्षेसाठी पोलिस तैनात आहेत. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी हंसडीहा पोलिस स्टेशन हद्दीतील कुंजी गावातील चार युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

विवाहीत युवकावर तिघांनी शेतामध्ये केला सामुहिक बलात्कार…

विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणारे तिघे अखेर अटकेत…

सासऱ्याने केला सुनेवर बलात्कार; तक्रार दाखल…

विकृती! भाडेकरूला मांजरावर बलात्कार करताना पकडले रंगेहाथ…

युवतीवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार; व्हिडिओ व्हायरल…

The post धक्कादायक! भारतात फिरायला आलेल्या स्पॅनिश महिलेवर सामुहिक बलात्कार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka