Dailyhunt
धक्कादायक! भोंदूबाबाने अंड्यातून काढला खिळा अन् मृतदेहाचा केला सौदा.

धक्कादायक! भोंदूबाबाने अंड्यातून काढला खिळा अन् मृतदेहाचा केला सौदा.

ठाणे : पतीच्या आजारपण तसेच मुलावरील काळी जादू उतरवण्यासाठी मृतदेहाची पूजा करायची आहे, असे सांगून महिलेकडून 8 लाख 87 हजार उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. असून हजरत बाबा उर्फ अमजद असद खान असे गुन्हा दाखल झालेल्या भोंदू बाबाचे नाव आहे.

तक्रारदार महिला यांचे पती अख्तर हे आजारी असल्याने त्यांनी उपचार करून ही सुधारणा होत नसल्याने आजार बरा करण्याच्या उद्देशाने महिलेन भोंदू बाबाकडे धाव घेतली. त्यावेळी, भोंदू बाबाकडून 8 लाख 87 हजारांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या दुकानात ऑक्टोंबर 2023 मध्ये ग्राहक म्हणून आलेल्या हजरत बाबा यांच्याशी ओळख झाली. त्याने चिंताग्रस्त पतीसोबत बोलताना तुमच्यावर काळी जादू झाली असल्याचे सांगितले. तसेच, मुलावर कोणीतरी काळी जादू केली असून मुलावरील काळी जादू न उतरवल्यास 6 महिन्यात तो जीव गमावून बसेल, अशी भीती दाखवली. काळी जादू संपवण्यासाठी कब्रस्तानातील मृतदेह आणावा लागेल. त्यातून पती व मुलावरील त्रास संपेल तसेच तुमची आर्थिक परिस्थिती सुधारून दुकान सुद्धा चांगले चालेल, असे सांगितले. पीडित महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्यासमोर घरात केलेल्या पुजे दरम्यान अंड्या मधून खिळा काढून दाखवला. त्यानंतर चांदवड मालेगाव येथे मृतदेह मिळणार असल्याचे सांगत पीडित कुटुंबीयांना बाबा चांदवड मालेगाव येथे घेऊन गेला. तेथील बाबाच्या साथीदाराने 10 लाख रुपयांत मृतदेह मिळेल असे सांगितल्यानंतर हजरत बाबा याने घासाघीस करून आठ लाख रुपयांत सौदा पक्का केला.

भोंदू बाबाने कोणताही मृतदेह न आणता एका बॉक्स मध्ये खोटा मृतदेह आणून तो गैबी नगरमधील इमारतीमध्ये ठेवला असल्याचे सांगितले. पैसे घेताना पीडित कुटुंबीयांचा विश्वास संपादन करण्यासाठी महिलेला एका मृतदेहाचा फोटो मोबाईलवर पाठवून दिला. पीडित कुटुंबीय कर्जबाजारी झाले असताना याच भोंदू बाबाने या पीडित कुटुंबीयाला खासगी सावकाराकडून महिना नऊ टक्के व्याजाने तीन लाख रुपये कर्जाने मिळवून दिले. परंतु, त्यानंतर भोंदू बाबाने कोणतेही काम न करता फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने पीडित महिलेने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोळकर यांच्याशी संपर्क साधला.

अनिसकडे पीडित महिलेने आपली कैफियत मांडली. त्यांनी सदरची घटना पोलीस आयुक्त यांना सांगताच पोलिस प्रशासनाची चक्रे वेगाने फिरली. त्यानंतर पीडित महिलेने दिलेल्या तक्रारी वरून शांतीनगर पोलिस ठाण्यात हजरत बाबा उर्फ अमजद असद खान या विरोधात भा.न्याय संहिता कलम ३१८(४),३१६ (२) सह महाराष्ट्र नरबळी आणि इत्तर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोना यांना प्रतिबंध घालण्या साठी व त्यांचे समूळ उच्चाटन करण्या बाबत अधिनियम २०१३ चे कलम ३(१) ३(२) अन्वये गुन्हा दाखल भोंदू बाबाच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला भिवंडी न्यायालयात हजर केले असता 15 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. त्याने अशाच पद्धतीने कोणाला फसवले आहे का याचा सुध्दा शोध पोलिस घेत आहेत, अशी माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.

भोंदूबाबा महिलेला काही टेन्शन घेऊ नकोस असं म्हणाला अन् खोलीमध्ये गेल्यावर…

भोंदूबाबा व्यापाऱ्याला बंद खोलीत घेऊन गेले अन् शुद्धीवर आल्यावर बसला धक्का…

धक्कादायक! मूल होत नसल्याने भोंदूबाबासह दिराने केला सामूहिक बलात्कार…

भोंदूबाबाच्या खोलीच्या आत खोली; महिलांना तिथे बोलवायचा अन्…

पुणे शहरात भोंदू बाबा म्हणाला पैशांचा पाऊस पाडतो अन् अचानक…

The post धक्कादायक! भोंदूबाबाने अंड्यातून काढला खिळा अन् मृतदेहाचा केला सौदा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka