Dailyhunt
धक्कादायक! चुलत्याने केला अल्पवयीन पुतणीवर अत्याचार, पीडितेने दिला बाळाला जन्म.

धक्कादायक! चुलत्याने केला अल्पवयीन पुतणीवर अत्याचार, पीडितेने दिला बाळाला जन्म.

बीड : चुलत्याने अत्याचार केल्याने 14 वर्षीय अल्पवयीन पुतणी गर्भवती राहिली आणि तिने बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चुलत्याविरुद्ध पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित अल्पवयीन मुलगी इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आई-वडिलांसोबत पीडित मुलगी उसतोडणीवरून परत येत असताना तिला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर आई-वडिलांना धक्का बसला आहे. चुलत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

बीड तालुक्यातील एका गावातील पीडितेच्या मोठ्या बहिणीचे जुलै 2023 मध्ये लग्न होते. त्यामुळे घरातील सर्व सदस्य लग्नाच्या कामात व्यस्त होते. यावेळी संधीचा गैरफायदा चुलत्याने घेतला. पीडिता ही चुलत बहिणीसोबत एका खोलीत झोपली होती. तिला धमकी देत तिच्यावर अत्याचार केला होता. पुढे पीडित मुलगी ही आपल्या आई-वडिलांसह ऊसतोडणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात गेली होती. सहा महिने ऊस तोडण्यात तिने मदतही केली.

दोन दिवसांपूर्वी काम संपल्याने हे सर्व लोक गावी परत येत होते. कळंबजवळ येताच पीडितेला प्रसूतीवेदना सुरू झाल्या. तिला तातडीने कळंबच्या एका रूग्णालयात दाखल केले. तेथे सोनोग्राफी करून लगेच तिची प्रसुती करण्यात आली. तिने एका मुलीलाही जन्म दिला. त्यानंतर याप्रकरणाला वाचा फुटली. चुलत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

प्रियकराची वाट पाहून आलाच नाही; अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म…

हनीमूनच्या दुसऱ्याच दुसऱ्याच दिवशी नवरीने दिला बाळ जन्म…

पुणे हादरलं! कुटुंबातील अगदी जवळच्या व्यक्तीकडून मुलगी गर्भवती…

पुणे शहरात कंपनीत एचआर पदावर काम करणाऱ्या युवतीवर बलात्कार…

The post धक्कादायक! चुलत्याने केला अल्पवयीन पुतणीवर अत्याचार, पीडितेने दिला बाळाला जन्म… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka