Dailyhunt
धक्कादायक! डॉक्टरने ब्लेडने चिरला मुलीचा गळा अन् पुढे.

धक्कादायक! डॉक्टरने ब्लेडने चिरला मुलीचा गळा अन् पुढे.

हिस्सार (हरियाणा): हिस्सार जिल्ह्यात एका डॉक्टरने आपल्या आठ वर्षांच्या मुलीची ब्लेडने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टरने त्यानंतर आत्महत्या केली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

संबंधित डॉक्टर पशुवैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हिस्सारमधल्या लाला लजपतराय पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान विद्यापीठाच्या रजिस्ट्रार ऑफिसमध्ये प्रोफेसर डॉ. संदीप गोयल कार्यरत होता. पोलिस अधिकारी राजेश मोहन यांनी सांगितले, डॉक्टर मानसिकदृष्ट्या आजारी होता. उपचार योग्य होत नसल्यामुळे त्यांनी अनेक डॉक्टर्स बदलले होते.’ आरोपी प्रोफेसर संदीप याने रविवारी (ता. 10) सायंकाळी पाचच्या सुमारास आपल्याच ऑफिसमध्ये सर्जिकल ब्लेड आणि चाकूच्या साह्याने आपल्या मुलीची हत्या केली. त्यानंतर स्वतःच्या पोटावर आणि हातांवर चाकूने वार करून आत्महत्या केली.

डॉ. संदीप गोयल हा पत्नी नीतू गोयल आणि एकुलती एक आठ वर्षीय मुलगी सायना हिच्यासह संस्थेच्या ओल्ड कॅम्पसमध्ये असलेल्या सरकारी क्वार्टर्समध्ये राहत होते. रविवारी चार वाजण्याच्या सुमारास ते दुकानात जायच्या बहाण्याने मुलीला घेऊन घराबाहेर पडले. तासभर झाला तरी ते परतले नाहीत. त्यामुळे त्यांची पत्नी आणि आई दोघींनी त्यांना फोन केला. तो उचलला न गेल्याने त्या दोघी या दोघांना शोधत त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्या. ऑफिसचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने तो दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा त्यांना बाप-लेक रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. मुलीचा गळा कापलेला होता आणि पोटातून आतडी बाहेर पडलेली होती. डॉ. संदीप यांच्या पोटाच्या आणि हाताच्या शिरा कापल्या गेल्या होत्या. दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस अधिकाऱ्यासोबत महिला डॉक्टरचे प्रेमसंबंध अन् आत्महत्या…

दुसऱ्या विवाहाचे फोटो ठेवले स्टेटसला, पहिल्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या…

महिला डॉक्टरची सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, गुन्हा दाखल…

डॉक्टराचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ…

राजाबाबू! डॉक्टर तर कधी अधिकारी सांगून 6 महिलांशी केली लग्न अन्…

प्रेमविवाह! डॉक्टरने पत्नीसह 2 मुलांना हातोड्यानं ठेचून मारलं अन् पुढे…

The post धक्कादायक! डॉक्टरने ब्लेडने चिरला मुलीचा गळा अन् पुढे… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka