Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धक्कादायक! एकाच गावातील युवक आणि युवतीची गळफास घेऊन आत्महत्या.

धक्कादायक! एकाच गावातील युवक आणि युवतीची गळफास घेऊन आत्महत्या.

सोलापूरः बार्शी तालुक्यातील पांढरी गावात एका युवकाने (वय २०) आणि अल्पवयीन मुलीने (वय १७) काही तासाच्या अंतरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परसिरता खळबळ उडाली आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

समर्थ उर्फ बाळू दत्तात्रय लोंढे याने गावातील एका शेतात असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. तर, अल्पवयीन मुलीने त्याच दिवशी काही तासांच्या अंतरात आपल्या राहत्या घरी लोखंडी पाईपाला गळफास लावून आत्महत्या केली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

दरम्यान, एकाच गावात आणि काही तासांच्या अंतरात दोघांनी आत्महत्या केल्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच पांगरी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. पोलिसांनी या दोन्ही घटनांची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून केली असून, आत्महत्येच्या कारणांचा पुढील तपास करत आहेत.

सोलापूर! मुलाचे गावातील महिलेसोबत प्रेमसंबंध; आईने केला विरोध अन्…

प्रेम! मुलीसाठी शोधला जावई अन् जावयाला आवडली मुलीची आई…

चालकासोबत मालकीणीचं प्रेमसंबंध; महिलेच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट…

मुख्याध्यापक पित्याची रेल्वेखाली आत्महत्या; मुलाचा त्रास असह्य…

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीची कारागृहात आत्महत्या…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka