Dailyhunt
धक्कादायक! मुलीची विक्री अन् नरकयातना समजताच वडिलांची आत्महत्या.

धक्कादायक! मुलीची विक्री अन् नरकयातना समजताच वडिलांची आत्महत्या.

ळगाव: एका अल्पवयीन मुलीला काम देण्याच्या बहाण्याने तिची विक्री केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने कोल्हापुरात एका व्यक्तीसोबत लग्न लावून तिचे लैंगिक शोषण केले. युवती गर्भवती राहिल्यानंतर आरोपींनी तिचा गर्भपात केला.

हा सगळा प्रकार पीडितेच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

भैया रामदास पाटील (वय ४१) असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे. आपल्या अल्पवयीन मुलीला कामाच्या बहाण्याने फसवून नेऊन विकले आणि तिचे जबरदस्तीने लग्न लावले. या धक्क्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

जळगाव शहरातील काही महिला पीडित मुलीला नोकरीच्या बहाण्याने नाशिकला घेऊन गेले होते. मात्र, तिला कोल्हापूर येथे एका व्यक्तीला दोन लाख रुपयांत विकले. शिवाय, तिचे बळजबरीने लग्न लावून दिले. जानेवारी 2025 मध्ये लग्न झाल्यानंतर मे महिन्यात तिचा गर्भपातही करण्यात आला, अशी माहिती मुलीने स्वतः घरी परत आल्यावर दिली. ही माहिती ऐकून वडील भैय्या पाटील यांना जबर मानसिक धक्का बसला. शिवाय, त्यानंतर संबंधित महिला आणि कोल्हापुरातील व्यक्तींकडून पाटील कुटुंबीयांवर सातत्याने धमक्या दिल्या जात होत्या. “मुलगी विकत घेतली आहे, पैसे आणि दागिने परत द्या, नाहीतर मुलगी परत पाठवा” असा दबाव आरोपींकडून टाकला जात होता. यामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या भैय्या पाटील यांनी रविवारी आत्महत्या केली.

दरम्यान, या घटनेमुळे कामाच्या आमिषाने मुलींना फसवून त्यांची विक्री करून जबरदस्तीने लग्न लावून देणारे रॅकेट उघडकीस येऊ शकते. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, मुलींच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलावीत आणि दोषींना तत्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

पुणे! मोबाईल गरम झाला अन् भोंदूबाबाचं भलतंच कांड झालं उघड…

अमरावतीमध्ये पोलिस अधिकाऱ्याची क्रूरपणे हत्या; आरोपींना ठोकल्या बेड्या…

'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवाला हिचा मृत्यू; स्वप्न राहिले अपूर्ण…

महाराष्ट्र हादरला! महिला कीर्तनकाराची आश्रमात दगडाने ठेचून हत्या…

बीडच्या क्लासमध्ये मुलीचं लैंगिक शोषण; केबिनमध्ये बोलावायचे अन् नको ते…

The post धक्कादायक! मुलीची विक्री अन् नरकयातना समजताच वडिलांची आत्महत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka