हैद्राबाद: आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात एका महिलेने घरी आलेले पार्सल उघडल्यानंतर मोठा धक्का बसला. पार्सलच्या आतमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह होता. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील उंडी मंडळातील येंडागंडी गावात ही भयानक घटना घडली.
नागा तुलसी नावाच्या एका महिलेने घर बांधण्यासाठी आर्थिक मदतीसाठी क्षत्रिय सेवा समितीकडे अर्ज सादर केला होता. समितीने त्या महिलेला घरासाठी टाइल्स पाठवल्या होत्या. तिने पुन्हा बांधकामात आणखी मदत मिळावी यासाठी पुन्हा एकदा क्षत्रिय सेवा समितीकडे अर्ज केला होता. समितीने वीज उपकरणं देण्याचे आश्वासन दिले होते. नागा तुलसी यांना व्हॉट्सअॅपवर एक मेसेज मिळाला होता की तिला दिवे, पंखे आणि स्विच यासारख्या वस्तू पुरवल्या जातील.
एका व्यक्तीने गुरुवारी रात्री महिलेच्या घराबाहेर एक बॉक्स डिलिव्हर केला होता. यामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणं असल्याची माहिती देण्यात आली होती. पण जेव्हा महिलेने बॉक्स उघडून पाहिला तेव्हा त्यात चक्क मृतदेह होता. महिलेच्या कुटुंबीयांनाही मृतदेह पाहिल्यानंतर धक्का बसला. त्यांना तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णलयात पाठलला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
पार्सलमध्ये एक पत्रही सापडले आहे. यामध्ये 1 कोटी 30 लाखांची मागणी करण्यात आली आहे. जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर कुटुंबाला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी पत्रात देण्यात आली आहे. पोलिस ज्याने पार्सल डिलिव्हर केलं त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत. शिवाय, परिसरांमधून बेपत्ता झालेल्या व्यक्तींची माहिती घेत आहेत.
धक्कादायक! प्रेम एकावर; सात फेरे दुसऱ्यासोबत अन् लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी…
धक्कादायक! ग्राईंडरमध्ये शर्ट अडकला अन् युवक कोबीसारखा चिरला गेला…
धक्कादायक! विद्यार्थ्याने शाळेच्या आवारातच प्राचार्यांच्या डोक्यात झाडली गोळी…
धक्कादायक! घरातले कामावर जाताच दिराने केला गरोदर वहिनीवर हल्ला…
पायलट युवतीच्या आत्महत्येबद्दल पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर…
The post धक्कादायक! पार्सल उघडल्यानंतर महिला हादरली; मृतदेह अन् सोबत मिळाली चिठ्ठी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

