Dailyhunt
धक्कादायक! पोलिस भरतीच्या तयारीसाठी अकॅडमीत गेलेल्या युवतीची आत्महत्या.

धक्कादायक! पोलिस भरतीच्या तयारीसाठी अकॅडमीत गेलेल्या युवतीची आत्महत्या.

त्रपती संभाजीनगर : पोलिस भरतीच्या तयारीसाठी स्वप्न उराशी बाळगून अकॅडमीत प्रवेश घेतलेल्या युवतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, युवतीच्या वडिलांनी अकॅडमीच्या संचालकासह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

लीना श्रीराम पाटील (वय १९) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. तिने मंगळवारी (ता. २०) गळफास आत्महत्या केली. लीना श्रीराम पाटील या युवतीने दीड वर्षापूर्वी बजाजनगरातील पोलिस आणि सैन्य भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या गरुडझेप अकॅडमीत प्रवेश घेण्यासाठी आली होती. या अकॅडमीत प्रवेश घेण्यासाठी लीना हिच्या पालकांनी तीन टप्प्यात १ लाख २० हजार रुपये भरण्याची तयारी दर्शवली होती. यात प्रशिक्षण शुल्क, खानावळीचे प्रतिमाहच्या खर्चाचा समावेश होता. ही तयारी दर्शविल्यानेच या अकॅडमीत तिला प्रवेश देण्यात आला होता. अकॅडमीत प्रवेश घेतल्यानंतर लीना ही गरुडझेपच्या वसतिगृहात इतर प्रशिक्षणार्थी मुलींसोबत राहत होती. अकॅडमीत प्रवेश घेतल्यानंतर खानावळीचे शुल्क भरण्यास विलंब झाला. यानंतर तिला मानसिक त्रासाने ती नाराज झाली होती.

लीना पाटील हिचा छळ केला जात असल्याने टोकाचे पाऊल उचलत तिने गळफास घेतल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी लीना हिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गरुडझेप अकॅडमीच्या संचालकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अकॅडमीचे संचालक प्रा. नीलेश सोनवणे आणि कर्मचारी खानावळीचे पैसे भरण्यास उशीर झाल्यावर तिला साधा नाश्ताही दिला जात नसल्याने आणि इतर प्रशिक्षणार्थीसमोर अपमानास्पद वागणूक देत होते. 'तू काळी आहेस…. असेही हिणवले जात असल्याने ती तणावात होती. या मानसिक छळामुळे आणि मैत्रिणीसमक्ष अपमान केला जात होता. जेव्हा दिवाळीच्या सुट्टीत ती गावी गेली, तेव्हा तिने हा सर्व वृत्तांत कुटुंबीयांना देत अकॅडमीत जाण्यास नकार दिला होता. यानंतर कुटुंबीयांनी तिला धीर देत, फी भरली जाईल काळजी करू नकोस, असे म्हणत समजूत काढत तिला पुन्हा बजाजनगरात अकॅडमीत प्रशिक्षणासाठी पाठवले होते. त्रास असह्य झाल्याने लीनाने टोकाचे पाऊल उचलत मंगळवारी (ता. २०) अकॅडमीच्या बाथरूममध्ये गळफास घेत जगाचा निरोप घेतला. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

राज्यात 17471 पोलिसांची होणार भरती…

पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीची आत्महत्या…

पोलिसकाकाने मैत्रिणीसोबत झालेल्या भांडणानंतर केली आत्महत्या…

महिला पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या…

The post धक्कादायक! पोलिस भरतीच्या तयारीसाठी अकॅडमीत गेलेल्या युवतीची आत्महत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka