सोलापूर: मंगळवेढा तालुक्यात ब्रह्मपुरी येथे हॉटेलच्या स्वयंपाकघरात गळफास घेत प्रसिद्ध रिलस्टारने जीवन संपवलं आहे रोहिणी निलेश पाराध्ये (वय २५) असे मृत रिलस्टारचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
ब्रह्मपुरी येथील 'हॉटेल ग्रामपंचायत' येथील स्वयंपाकघरात रोहिणी हिने दोरीच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेतला. हे पाहताच तिचे पती निलेश पाराध्ये यांनी तत्काळ खाली उतरवून मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासाअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची नोंद मंगळवेढा पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत पती निलेश पाराध्ये यांनीच फिर्याद दिली असून आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
रोहिणी आणि निलेश पाराध्ये हे दाम्पत्य विविध सामाजिक विषयांवर रिल्स बनवत होते. तसेच त्यांच्या खाद्यपदार्थांच्या व्हिडिओंना देखील मोठा प्रतिसाद मिळत होता. त्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ब्रह्मपुरी येथे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत त्यांनी 'हॉटेल ग्रामपंचायत' या नावाने व्यवसाय सुरू केला होता. त्याला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
रोहिणी आणि निलेश यांचा हॉटेल व्यवसाय चांगला चालत होता. त्यांनी नवीन शाखा सुरू करण्याचे नियोजन सुरू केले होते. अशावेळीच रोहिणीने अचानक टोकाचे पाऊल उचलले. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. या आत्महत्येमागे नेमकं कारण काय आहे? याचा उलगडा अद्याप झालेला नाही. मात्र, मानसिक तणावातून ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनं सोशल मीडियावर शोककळा पसरली आहे. पोलिस तपास करत आहेत.
सोलापूर हादरलं! दिराने मधरात्री घरात घुसून वहिनीसह 2 पुतण्यांना तलवारीनं भोसकलं…
सोलापूर! एकतर्फी प्रेमातून पत्नीचा छळ, दामपत्याने संपवलं जीवन…
सोलापूर! प्रसिद्ध उद्योजकाने १७व्या मजल्यावर जात हात जोडत डोळे मिटले अन्…

