Dailyhunt
सोलापूर! एकतर्फी प्रेमातून पत्नीचा छळ, दामपत्याने संपवलं जीवन.

सोलापूर! एकतर्फी प्रेमातून पत्नीचा छळ, दामपत्याने संपवलं जीवन.

सोलापूर: एकतर्फी प्रेमातून पत्नीला छळणाऱ्या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून एका दामपत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमनाथ पाटील आणि श्रीदेवी पाटील असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

या प्रकरणी संशयित अभिषेक कोरे याला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

सोलापुरातील कलावती नगर भागात राहणाऱ्या सोमनाथ पाटील आणि श्रीदेवी पाटील दामपत्याचे मृतदेह राहत्या घरात आढळून आले होते. दामपत्याने आत्महत्या केली की हत्या असा संशय काल निर्माण झाला होता. मात्र या दोघांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेल्या चिट्ठीमुळे दोघांच्या मृत्युचे कारण समोर आले आहे. याप्रकरणतील आरोपी अभिषेक कोरे हा श्रीदेवी पाटील यांना फोनवरून वारंवार त्रास देत होता. तुझी बदनामी करेन अशी धमकी देत होता. या धमकी आणि बदनामीला कंटाळून श्रीदेवी आणि सोमनाथ पाटील या दोघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिट्ठीच्या आधारे संशयित अभिषेक कोरे याला पोलिसांनी अटक केली आहे.

 पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

दरम्यान, सोलापूर शहरातील कलावती नगरात राहत्या घरी पती-पत्नीचे मृतदेह काल सकाळी आढळून आले होते. दोघेही तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत सापडल्याने ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत संशय निर्माण झाला होता. घरात पती-पत्नीसह दोन मुलीही होत्या. मात्र सकाळी आई वडील झोपेतून उठत नसल्याचे कळताच मुलींनी काकांना फोन करुन ही घटना सांगितली. त्यानंतर दोघांनाही शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान दोघांच्या मृतदेहाजवळ एक चिट्ठी सापडल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिट्ठीच्या आधारे संशयित अभिषेक कोरे याला पोलिसांनी अटक केली आहे.

सोलापूर! प्रसिद्ध उद्योजकाने १७व्या मजल्यावर जात हात जोडत डोळे मिटले अन्…

सोलापूर! पोलिस पत्नीने शेवटचा मेसेज करून उचललं टोकाचं पाऊल…

सोलापूर! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने बॉईज हॉस्टेलमध्ये उचललं टोकाचं पाऊल…

सोलापूरमध्ये नर्तिकेवरून गोळीबार; तू मला काय भुरटा समजतो काय…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka