Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धक्कादायक! प्रेमविवाहाला मदत केली म्हणून युवकाला बोलेरोखाली चार वेळा चिरडले.

धक्कादायक! प्रेमविवाहाला मदत केली म्हणून युवकाला बोलेरोखाली चार वेळा चिरडले.

त्रपती संभाजीनगर : प्रेमविवाहाला मदत केली म्हणून संतापलेल्या बापाने मुलाच्या मामेभावाची बोलेरो खाली चिरडून हत्या केल्याची धक्कादायक घटना गंगापूर तालुक्यात शेंदूरवाडा येथे घडली आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पवन शिवराम मोढे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. सचिन भागचंद वाघचौरे याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने पवन आणि त्याचे वडील शिवराम यांच्या अंगावर जीप घातली. पवनच्या डोक्यावरून चार वेळा गाडी घालण्यात आली. यात तो जागीच ठार झाला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सचिन वाघचौरे याच्या मुलीचा शिवराम मोढे यांच्या भाच्याशी प्रेमविवाह झाला होता. मुलीने मनाविरुद्ध लग्न केल्याचा राग सचिनच्या मनात होता. यावरूनच गुरुवारी दुपारी शेंदूरवादा शिवारात सचिन जीप घेऊन आला होता. तेव्हा शिवराम आणि त्यांचा मुलगा दुचाकीने आले होते. सचिनने चारचाकी गाडीने दुचाकीला जोराची धडक दिली. त्यानंतर पवनच्या डोक्यावर जीप घातली. त्याला जागीच ठार केले. या घटनेत शिवराम जखमी झाले असून त्यांच्यावर सावखेडा येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी शिवराम यांनी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सचिनचा शोध पोलिस घेत आहेत. हत्या झालेल्या पवनचे लग्न ठरले होते. एप्रिल महिन्यात लग्न होणार होते. त्याआधी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

पुढच्या आठवड्यात विवाह असल्याने मृत युवक आपल्या वडिलांसोबत बँकेतून पैसे आणायला बाहेर गेला होता. यावेळी त्याच्या दुचाकीला बोलेरोच्या मदतीने जोरदार धडक दिली. युवक खाली पडल्यानंतर त्याच्या अंगावर चार वेळा बोलेरो कार घालून त्याची हत्या करण्यात आली. संभाजीनगरच्या वाळुज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेंदूरवादा- सावखेडा महामार्गावर ही घटना घडली होती. एखाद्या सिनेमाच्या कथानकलाही लाजवेल असा हा धक्कादायक प्रकार असल्याचे या परिसात म्हटले जात आहे.

मृत पवन हा शेतकरी असून त्याच्या मामाचा मुलगा विशाल लक्ष्मण नवले याने संशयित आरोपी सचिन वाघचौरे, विशाल वाघचौरे यांच्या बहिणीशी पळून जावून विवाह केला होता. त्यांच्या विवाहाला पवन याने मदत केली होती. याचाच राग मनात धरून संशयित आरोपींनी बोलेरोने पवनच्या दुचाकीला जोरदार दिली. यामध्ये पवन गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर पवनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

धक्कादायक! नवऱ्याच्या घराजवळच थाटला प्रेमविवाहानंतर दुसरा संसार अन् पुढे…

सैराटची पुनारवृत्ती! प्रेमविवाहानंतर बाप आणि भाऊ चिडला अन्…

प्रेमविवाहानंतर गावातील युवकासोबत सुरू झाले प्रेमसंबंध अन् पुढे…

प्रेमविवाहानंतर तिसऱ्याच महिन्यात घडली धक्कादायक घटना…

प्रेमविवाहानंतर नवऱ्यासह पाच जणांचा काढला काटा; गूढ उकलले…

The post धक्कादायक! प्रेमविवाहाला मदत केली म्हणून युवकाला बोलेरोखाली चार वेळा चिरडले… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka