Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धक्कादायक! शरीरसुखाची मागणी करणाऱ्या आरोपीची फोनवरून विचित्र मागणी.

धक्कादायक! शरीरसुखाची मागणी करणाऱ्या आरोपीची फोनवरून विचित्र मागणी.

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये भावकीतीलच विवाहीत महिलेकडे (वय ३६) शरीरसुखाची मागणी करणाऱ्या युवकाने (वय १९) कटरने वार केले. त्यामुळे तब्बल 280 टाके घालावे लागले आहेत. पीडित महिला एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

अभिषेक तात्याराव नवपुते असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. बलात्काराचा प्रयत्न केल्यानंतर विवाहितेने आरडाओरडा सुरू केल्याने आरोपीने वार केले आहेत. तिचा चेहराही विद्रूप करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. रविवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे.

पिडितेने या घटनेबाबत माहिती दिली, ‘आरोपीने माझ्यावर इतके वार केले आहेत की, डॉक्टरला गोधडीवानी माझं अंग शिवावं लागलं. एकही अवयव असा नाही की जिथे फाडलेले नाही. त्या घावांमुळे सगळ्या अंगातच आगडोंब उठला आहे. या यातना सहन होत नाही, पण रडताही येत नाही. कारण, डोळ्यातून आलेलं पाणी टाके शिवलेल्या जखमेला लागलं तर आणखीच आग मारते. आता मी करू तरी काय?’

पीडित महिलेच्या अंगावर तब्बल 280 टाके घालावे लागले आहेत. महिलेच्या मानेपासून ते कमरेपर्यंत सव्वादोन फुटांचा एक वार आहे. भयंकर वेदना सहन करत ही महिला एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. घरातील परिस्थिती जेमतेम आहे. त्यांना 11 वर्षांची दोन मुलं आहेत. सासरप्रमाणेच त्यांच्या माहेरची परिस्थितीही हलाखीची आहे. पीडितेवर उपचार करण्यासाठी आता जो खर्च येईल त्यासाठी त्यांकडे पुरेसे पैसेही नाहीत. पिडीतेच्या अंगावर 280 टाके पडले आहेत, यासाठी लागणाऱ्या दोऱ्यांचा खर्चच 22 हजार इतका आला आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना पिडीतेने ही माहिती दिली आहे.

दरम्यान, महिला शेतात काम करत असताना अभिषेकचा मला फोन आला. तो म्हणाला की, एक तर तू माझ्याबरोबर झोप, नाही तर तुझ्या जावेशी माझे जुळवून दे. महिलेने फोन कट केला. त्यानंतर संध्याकाळी महिला शेतातलं काम संपवून पांदीच्या रस्त्याने एकटीच जात असताना अचानक पाठीमागून येऊन त्याने वेणी खेचली आणि डोके दगडावर आपटले. महिलेला काही कळायच्या आतच त्याने पहिल्यांदा कटरने चेहऱ्यावर वार केला. महिला ओरडायचा प्रयत्न केला तर त्यानं गळ्यावरच वार केला आणि लगेच सपासप सगळीकडे वार सुरू केले. पाठीवरचा वार तर एवढा भयंकर होता की मानेपासून मांडीपर्यंत चिरून काढला आहे.

विवाहित महिलेवर शेतात बलात्काराचा प्रयत्न; चेहऱ्यासह शरिरावर केले 15 पेक्षा जास्त वार…

मुंबई हादरली! जोगेश्वरीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; बसला मानसिक धक्का…

पुणे जिल्हा हादरला! युवतीवर सामूहिक बलात्कार करून केले Video शुटिंग….

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे गजाआड; तहान लागली अन्…

विवाहित महिलेचा खून केल्यावर प्रियकराने केला मृतदेहावर बलात्कार…

धक्कादायक! रिसॉर्टमध्ये युवतीने केला युवतीवर सलग तीन दिवस बलात्कार…

गोव्यात युवतीवर पाच जणांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka