Dailyhunt
गोव्यात युवतीवर पाच जणांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार.

गोव्यात युवतीवर पाच जणांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार.

णजी (गोवा) : एका आरोपीने पीडितेच्या (वय २५) भोळेपणाचा फायदा घेऊन तिला गेस्ट हाऊसवर घेऊन गेल्यानंतर आरोपीने आपल्या चार मित्रांना फोन करून घटनास्थळी बोलावले. यानंतर पाच आरोपींनी पीडित युवतीवर रात्रभर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

पीडित युवती मनोरुग्ण आहे. ती दक्षिण गोव्यातील फातोर्डा परिसरात वास्तव्याला असते. घटनेच्या दिवशी बुधवारी रात्री ती मडगावच्या कदंबा बस स्थानकावर पोहोचली होती. यावेळी बस स्थानकावर असलेली गर्दी पाहून पीडित युवती घाबरली होती. युवतीची अवस्था बघूनआरोपी आदिल अलगर (वय १८) याने पीडितेला बसमधून वास्को येथे आणले. वास्कोत पोहोचल्यावर आरोपीने आपल्या अन्य चार मित्रांना कॉल करून वास्कोत बोलावले.

पाचही आरोपींनी पीडित तरुणीला गोड बोलून कासावली येथील गेस्ट हाऊसवर नेले. इथं गेल्यावर पीडित तरुणीच्या मनस्थितीचा फायदा घेत, पाचही आरोपींनी पीडितेवर रात्रभर सामूहिक अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी गुरुवारी पहाटे आरोपींनी पीडितेला नुवे जंक्शन परिसरात आणून सोडलो. यानंतर पीडित युवती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना लिफ्ट मागत होती. तरुणीची ही अवस्था पाहता, काहींना तिच्यावर अत्याचार झाल्याचा संशय आला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी युवतीला पोलिस ठाण्यात नेत तिची चौकशी केली. पोलिसांनी कोणताच पुरावा हाती नसताना अवघ्या दोन तासांत घटनेची उकल केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी पाचही आरोपींची ओळख पटवत अवघ्या दोन तासांत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. आदिल अलगर (वय 18), मोहम्मद अली मुल्ला (वय 22) शहजाद शेख वय 18), वीरेश आग्वांदा (वय 18) आणि मोहम्मद शेख (वय 18) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. ते सर्वजण वास्को येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे. पोलिस पाचही जणांची कसून चौकशी करत आहेत.

गोव्यामध्ये मध्यरात्री गुगल मॅप लावून मित्र-मैत्रीण फिरत होते अन् पुढे…

महिलेला मदतीच्या बहाण्याने अंधारात घेऊन गेले अन् केला सामूहिक बलात्कार…

धक्कादायक! मूल होत नसल्याने भोंदूबाबासह दिराने केला सामूहिक बलात्कार…

धक्कादायक! नवऱ्यासमोर महिलेवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार…

मुंबईत मैत्रीच्या ओळखीचा गैरफायदा! सामूहिक बलात्कार…

The post गोव्यात युवतीवर पाच जणांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka