Dailyhunt
धक्कादायक! सुरक्षा रक्षकावर केलेला जीवघेणा हल्ला CCTV मध्ये कैद.

धक्कादायक! सुरक्षा रक्षकावर केलेला जीवघेणा हल्ला CCTV मध्ये कैद.

पुणे: पिंपरी-चिंचवड परिसरात एकाने सुरक्षा रक्षकावर जीवघेणा हल्ला केला आहे. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

'पुणे गणपती डायरी २०२५-२६'ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

सुदाम कामीठे असे हल्ला झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव असून, राम लोंढे असे आरोपीचे नाव आहे. सुरक्षारक्षक सुदाम कामीठे हे पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड गावात शांतीबन सोसायटीच्या गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. शुक्रवारी रात्री ते नेहमीप्रमाणे आपल्या ड्युटीवर होते. यावेळी आरोपी राम लोंढे त्याठिकाणी आला. त्याने सोसायटीत घुसण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्याला आडवल्यानंतर दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. यानंतर आरोपीने अचानक खिशातील चाकू काढून सुरक्षारक्षक सुदाम कामीठे यांच्यावर हल्ला केला. यावेळी कामीठे यांनी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी टेबलवर ठेवलेला सिमेंटचा गट्टू उचलून आरोपीला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने त्यांच्या पोटात चाकू खुपसला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने सुरक्षा रक्षकाच्या हातातील सिमेंटचा गट्टू हिसकावून घेत, त्यांच्याच डोक्यात घातला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राम लोंढे हा व्यसनाधीन आहे. याच आरोपावरून सोसायटीने त्याला हाऊस किपिंगच्या कामावरून काढून टाकले होते. या कारवाईचा राग त्याच्या डोक्यात होता. त्यातूनच हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. हल्ल्याच्या या घटनेनंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

अभिनेता तुषार घाडीगावकार याने काम न मिळाल्यामुळे नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल…

धनदांडग्याच्या मुलीने मर्सिडीजने दुचाकीला दिली धडक; महिलेने जागेवरच सोडला प्राण…

सोलापुरातील दुहेरी मृत्यूकांडात नवा ट्विस्ट; जमलं तर माझ्या माथ्यावर कुंकू लावून जा…

युवकाने भररस्त्यात युवतीला काठीने केली मारहाण; इतर मुलांशी का बोलतेस…

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्गावर 3000 रुपयांचा Fastag चालणार का? घ्या जाणून…

The post धक्कादायक! सुरक्षा रक्षकावर केलेला जीवघेणा हल्ला CCTV मध्ये कैद… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka