Dailyhunt
धनदांडग्याच्या मुलीने मर्सिडीजने दुचाकीला दिली धडक; महिलेने जागेवरच सोडला प्राण.

धनदांडग्याच्या मुलीने मर्सिडीजने दुचाकीला दिली धडक; महिलेने जागेवरच सोडला प्राण.

मुंबई: नवी मुंबईत धनदांडग्याच्या मुलीच्या मर्सिडीजने स्कुटी जोरात धडक दिली. या घटनेत दुचाकीवरील रेखा यादव या हवेत फेकल्या गेल्या आणि जागेवरच प्राण सोडल्याची घटना घडली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नवी मुंबईच्या न्यू पनवेल परिसरात एका युवतीने (वय १९) मर्सिडीज कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या दोघांना उडवले. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. नवीन पनवेल येथील हिरानंदानी पुलावर बुधवारी रात्री 8.45 वाजता हा अपघात घडला. खारघर पोलिसांनी याप्रकरणी भरधाव वेगात मर्सिडीज बेंझ कार चालवणाऱ्या मुलीला अटक केली आहे. या मुलीचे नाव तिथी सिंग (वय 19) असे असून ती इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे.

या अपघातामध्ये रेखा यादव (वय 50) या महिलेचा मृत्यू झाला असून, त्यांचे पती गोपाल यादव (वय 54) हे अपघातामध्ये गंभीररित्या जखमी झाले आहेत. गोपाल आणि रेखा यादव हे पनवेलमधील देवद भागात वास्तव्याला आहेत. रेखा यादव या घाटकोपरच्या पंतनगर येथील एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होत्या. बुधवारी रात्री रेखा यादव आणि त्यांचे पती गोपाल यादव स्कुटरवरुन घरी परत येत होते. त्यावेळी शीव-पनवेल महामार्गावरील खारघर परिसरात असणाऱ्या हिरानंदनी पुलावरून त्यांची स्कुटर खाली उतरत होती. त्यावेळी तिथी सिंग ही तिच्या मर्सिडीज कारने भरधाव वेगात येत होती. तिच्या मर्सिडीज बेंझ कारने पाठीमागून यादव दाम्पत्याच्या स्कुटरला धडक दिली. यावेळी रेखा यादव आणि गोपाल यादव दोघेही हवेत फेकले गेले आणि जोरात खाली आपटले. यामध्ये रेखा यादव यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोपाल यादव यांच्या पायाला, हाताला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. इतर वाहन चालकांनी जखमी गोपाल व त्यांची पत्नी रेखा या दोघांना बाहेर काढून गंभीर जखमी अवस्थेत कामोठे येथील एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी रेखा यांना मृत घोषित केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिथी सिंग ही बेलापूरवरुन आपल्या मित्रांना भेटून परत येत होती. त्यावेळी हा अपघात घडला. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली जात आहे. तसेच पोलिसांकडून मर्सिडीज कार चालवणाऱ्या तिथी सिंग हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक! मुंबईतील महाविद्यालयात युवतीचा मृत्यू; हत्या की आत्महत्या…

पुणे! जेजुरीजवळ भीषण अपघातात 7 जण जागीच ठार; पाहा नावे…

Video: सयाजी राजे वॉटर पार्कमध्ये भीषण अपघातात उद्योजकाचा मृत्यू…

इंद्रायणी नदीवरील पूल अपघातातील जखमी आणि मृतांची नावे पाहा…

अहमदाबाद विमान अपघातात महाराष्ट्रच्या 6 जणांचा मृत्यू; पाहा नावे…

The post धनदांडग्याच्या मुलीने मर्सिडीजने दुचाकीला दिली धडक; महिलेने जागेवरच सोडला प्राण… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka