Dailyhunt
दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती मृत्यू प्रकरणी दिले स्पष्टीकरण.

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती मृत्यू प्रकरणी दिले स्पष्टीकरण.

पुणे : पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून न घेतल्यामुळे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या सुशांत भिसे यांच्या पत्नीला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप होत आहे.

प्रसुतीसाठी रूग्ण दाखल करून घेताना दहा लाख रूपये भरण्यास सांगत उपचार करण्यास रुग्णालयाने नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात भिसे कुटुंबियांचे जबाब पोलिसांनी नोंदवले. पोलिस आज रुग्णालयात जाऊन चौकशी करणार असून रूग्णालयातल्या डॉक्टरांचे जबाब घेऊन पोलिस याचा अहवाल जिल्हा मेडिकल बोर्डाकडे सोपवणार आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तज्ञांची समिती स्थापन केली आहे. त्याचबरोबर आता त्यांचा अहवालही समोर आला आहे.

तज्ञांची समिती स्थापन करून अहवाल तयार
याप्रकरणी रुग्णालयाने खालील तज्ञांची समिती स्थापन करून अहवाल तयार केलेला आहे.
1. वैद्यकीय संचालक डॉ धनंजय केळकर
2. डॉक्टर अनुजा जोशी वैद्यकीय
3. डॉक्टर समीर जोग अतिदक्षता विभाग प्रमुख
4. श्री सचिन व्यवहारे प्रशासक

अहवालात म्हटले की…
१. सौ. भिसे ईश्वरी सुशांत (वृत्तपत्र व वाहिन्यांवर प्रसारित झालेले नाव सौ तनिषा सुशांत भिसे) MRD १०५३७६३. या २०२० पासून रुग्णालयात वेळोवेळी उपचार व सल्ला घेण्यासाठी येत होत्या.
२. सदर महिला रुग्णाची २०२२ साली दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये ५०% चॅरिटीचा लाभ घेऊन शस्त्रक्रिया झाली होती.
३. २०२३ साली या रुग्णाला रुग्णालयातर्फे सुखरूप गर्भारपण व प्रसूती होण्याची शक्यता नसल्याने मूल दत्तक घेण्या विषयी सल्ला देण्यात आला होता.
४. सर्व रुग्णालयामध्ये असा संकेत असतो कि आई व बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रसूतीपूर्व तपासणी (ANC) कमीत कमी 3 वेळा करून घेणे आवश्यक असते. तो त्यांनी या रुग्णालयात केला नाही व त्याची या रुग्णालयास माहिती नाही.
५. १५ मार्च रोजी इंदिरा IVF चे रिपोर्ट घेऊन त्या डॉक्टर घैसास यांना भेटल्या. अतिशय जोखमीच्या व धोकादायक pregnency बद्दल डॉक्टर घैसास यांनी त्यांना माहिती दिली. दर ७ दिवसांनी तपासणीस बोलावले. त्याप्रमाणे त्यांनी २२ तारखेस येणे अपेक्षित होते. परंतु तेव्हाही त्या आल्या नाहीत.
६. २८ मार्च २०२५ शुक्रवार रोजी सकाळी ११.३० वाजला सदर रुग्ण, पती व नातेवाईक डॉक्टर पैसास यांच्या बाह्यरुग्ण विभागात आले. ते Emergency किंवा Labour Room मध्ये आले नव्हते, याची कृपया नोंद घ्यावी.

डॉक्टर घैसास यांनी तिची तपासणी केली. ती पूर्णपणे नॉर्मल होती व तिला कुठल्याही तातडीच्या उपचाराची गरज नव्हती. परंतु जोखमीची अवस्था लक्षात घेता observation साठी भरती होण्याचा सल्ला दिला. त्याच बरोबर pregnancy a caesarean section मधील धोक्याची माहिती देण्यात आली. तसेच नवजात अर्भक कक्षाच्या (NICU) डॉक्टरांशी त्यांची भेट करून देण्यात आली. कमी वजनाची, ७ महिन्याची जुळी मुले, जुन्या आजाराची गुंतागुंत व कमीत कमी २ ते २.५ महिने NICU चे उपचार लागतील हे समजावून सांगितले व रुपये १० ते २० लाख खर्च एकंदर येऊ शकतो याची कल्पना देण्यात आली. त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी तुम्ही भरती करून घ्या व मी प्रयत्न करतो असे सांगितले.

रुग्णाच्या नातेवाईकांनी वेद्रद्यकीय संचालक डॉक्टर केळकर यांना फोन केला व आपली अडचण सांगितली. त्यावर डॉक्टर केळकरांनी जमतील तेवढे पैसे भरा (नातेवाईकांप्रमाणे रुपये २ ते २.५ लाख), म्हणजे मी डॉक्टर घैसास यांना सांगतो, असे सांगितले. असाच सल्ला एका दूरच्या नातेवाईकांना श्री सचिन व्यवहारे यांनी फोनवर दिला. रुग्णाचा कोणीही नातेवाईक प्रशासन अथवा चॅरिटी डिपार्टमेंट इथे प्रत्यक्ष भेटला नाही याची कृपया नोंद घ्यावी. जेव्हा डॉक्टर केळकर यांचे ऑपेरेशन संपले व त्यांनी डॉक्टर घैसास यांना फोन केला तेव्हा त्यांनी रुग्ण न सांगता निघून गेल्याचे कळवले.

डॉक्टर घैसास ह्यांना असे वाटत होते की रुग्ण पैश्याची तजवीज करत आहे. तशी तजवीज न झाल्यास रुग्णाच्या पतीला ससून येथे जाण्याचा सल्ला दिला होता. जेणेकरून आईची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया व होणाऱ्या अपुऱ्या वाढीच्या गर्भाची शुश्रूषा ससून येतील NICU मध्ये व्यवस्थित होईल. दरम्यानच्या काळात एका नर्सने रुग्ण /नातेवाईक आपली बॅग उचलून चालत गेल्याचे सांगितले. थोड्या वेळाने रुग्णाच्या नातेवाईकांकडून काहीच हालचाल न झाल्याने डॉ. पैसास यांनी रुग्णाच्या पतीला फोन केला, तो त्यांनी उचलला नाही. त्यामुळे २८ मार्च च्या दुपारनंतर रुग्णाचे काय झाले याबद्दल डॉ. घैसास व रुग्णालय प्रशासन यांना काहीच कल्पना नव्हती.

यानंतर Daily Mirror मध्ये आलेल्या बातमीनंतर सर्वांना कळले की रुरणाचा सिझेरियनमध्ये झालेल्या गुंतागुंतीमुळे मृत्यू झाला. वृत्तपत्रातील माहिती प्रमाणे, २८ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता सूर्या हॉस्पिटल वाकड़ रपये भरती झाली व २६ मार्च राजी सकाळी सिडोरियन झाले. दीनानाथमधून सदर रुग्ण ससून व तिथून सूर्या हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या गाडीने गेला व सिझेरियन सुद्धा दुसऱ्या दिवशी झाले ह्याची नोंद घ्यावी. तसेच सूर्या हॉस्पिा ल मधील माहितीनुसार आधीच्या operation ची व कॅन्सर संबंधीची व तिच्या नातेवाईकांनी माहिती लपवून ठेवत की असे समजते.

सदर चौकशी अंती व रुग्णालयातील इतर सिनियर gynaecologist च्या opinion नुसार आमच्या समितीचा निष्कर्ष खालीलप्रमाणे :
– रुग्णासाठी Twin Pregnancy धोकादायक होती.
– माहितीचे रुग्णालय असून सुद्धा ANC चेकअप पहिले सहा महिने रुग्णालयात आल्या नाहीत.
– Advance मागितल्याच्या रागातून सदर तक्रार केलेली दिसते.
– रुग्णालयाचे वैद्यकीय सल्ले जसे मानले नाहीत तसेच वैद्यकीय संचालकांनी जमेल तेवढे पैसे भरून ऍडमिट होण्याचा सल्ला पण त्यांनी पाळला नाही.
– रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा व advance मागितल्यामुळे आलेल्या रागातून ही दिशाभूल करणारी तक्रार करण्यात आली आहे असे समितीचे मत आहे.
– रुग्णालयाचे वैद्यकीय सल्ले जसे मानले नाहीत तसेच वैद्यकीय संचालकांनी जमेल तेवढे पैसे भरुन ऍडमिट होण्याचा सल्ला पण त्यांनी पाळला नाही. रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा व advance मागितल्यामुळे आलेल्या रागातून ही दिशाभूल करणारी तक्रार करण्यात आली आहे असे समितीचे मत आहे.

पुणे! गर्भवतीच्या उपचारासाठी रग्णालयाने मागितले 10 लाख, महिलेचा मृत्यू…

रुबी हॉल रुग्णालयातील महिला कर्मचाऱयाची आत्महत्या; एचआर हेडसह दोघांविरुद्ध गुन्हा…

खाजगी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा तासाभरातच मृत्यू…

ससूनचा कारभार! दिशा भोईटे प्रकरण अद्याप संपलेले नाही…

दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का?

मुलाच्या मृत्यूनंतर तब्बल 11 दिवस ठेवले व्हेंटिलेटरवर; सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल…

The post दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती मृत्यू प्रकरणी दिले स्पष्टीकरण… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka