Dailyhunt
दीर आणि वहिणीचे जुळले प्रेमसंबंध; नवऱ्याला समजले अन्.

दीर आणि वहिणीचे जुळले प्रेमसंबंध; नवऱ्याला समजले अन्.

खनौ (उत्तर प्रदेश) : दीरावर प्रेम करणाऱ्या महिलेने दीर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने आपल्या पतीच्या हत्येचा कट रचला आणि हत्या केल्याची धक्कादायक घटना बिजनौर जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

एका महिलेचे आपल्या दिरावर प्रेम जडले होते. दोघांचे सूत जुळल्याचे पतीच्या लक्षात आले. त्याने दोघांच्या नात्याला विरोध केला. पुढे कुटुंबामध्ये वाद होऊ लागले. त्यानंतर दीराच्या प्रेमात वेड्या झालेल्या महिलेनं पतीची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नहटौर पोलिस स्टेशनच्या हद्दीत 1 जुलै रोजी मृत राणूचे वडील शीशराम यांनी तक्रार दाखल केली होती. मुलगा राणू त्यांच्या खोलीत झोपला होता. त्यानंतर काही अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून त्याच्यावर गोळी झाडल्याचे सांगितले. गोळी झाडल्यानंतर राणूला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर उपचारादरम्यान राणूचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर सर्वांनाच धक्का बला.

आरोपी विक्की याने पोलिस चौकशीत सांगितले की, ‘वहिणी आणि मी एकमेकांशी नेहमी बोलायचो. पुढे आमच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. भाऊ मारहाण करत असल्याचे वहिणीने सांगितले. यामुळे राणूला मार्गातून दूर केलं तर आमचं काम सोपं होईल आणि बदनामीपासूनही वाचू. त्यामुळे आम्ही कट रचून रानूला संपवण्याचा निर्णय घेतला. राणूला आमच्या प्रेमाच्या मार्गातून दूर करण्यासाठी मी माझा मित्र सागर याला सर्व काही सांगितले आणि एक कट रचला. राणूची पत्नी तिच्या आई-वडिलांकडे माहेरी गेली, तेव्हा आम्ही सर्वांनी मिळून हत्या करण्याचे ठरवले. मी सागरसह राणूच्या वडिलांना दारू पाजली. राणूचे वडील दारू पिऊन झोपी गेले. त्यानंतर मी सागरकडे भरलेले पिस्तूल दिले आणि त्यानं राणूवर गोळी झाडली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.’

दरम्यान, पोलिसांनी आरोपी महिला, तिचा दिर आणि त्याच्या मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.

दिर आणि वहिणीचे अनैतिक संबंध अन् जीव गेला चिमुकल्याचा…

अनैतिक संबंध! मध्यरात्री पत्नी बेपत्ता झाली अन् एका कॉल आला…

हृदयद्रावक! वहिनीचे दिरासोबत प्रेमसंबंध; तीन चिमुकले अन् पोलिस…

वहिनीसोबत प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंध अन् एकदा…

पत्नीला शेतामध्ये प्रियकरासोबत पाहिल्यानंतर नवरा चिडला अन्…

Video: दीरासोबत लग्न करण्यासाठी दोन वहिनींमध्ये जोरदार राडा…

The post दीर आणि वहिणीचे जुळले प्रेमसंबंध; नवऱ्याला समजले अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka