अकोला : एका महिला दिराच्या प्रेमात अक्षरशः वेडी होऊन चक्क आपल्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखळ केला असून, दिर आणि वहिनीला ताब्यात घेतले आहे.
अकोला जिल्ह्यातील तुलुंगा गावातील रहिवासी असलेले मेसरे नावाचे एक जोडपं बाळापूर तालुक्यातल्या तामशी गावातील वीट भट्टीवर कामासाठी आले होते. प्रमोद मेसरे आणि मंगला मेसरे असं या दोघा पती-पत्नीचे नाव आहे. दरम्यान, काम करत असताना रविवारी अचानकपणे प्रमोदचा मृत्यू झाला. या संदर्भात पत्नीने बाळापुर पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री गाढ झोपीत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला, असे मंगलाने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला आकस्मित मृत्यूची नोंद केली आणि तपास सुरू केला.
पत्नीने पोलिसांना सांगितले की, पती दारूच्या प्रचंड आहारी गेला असून तो त्यात व्यसनाधीन झाला होता. त्यामुळे हा आकस्मित मृत्यू असावा. दरम्यान, दोन दिवसानंतर प्रमोद यांचा वैद्यकीय अहवाल समोर आला. यात त्याचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या प्रकरणात धागेदोरे तपासले असता, मृत प्रमोदची पत्नी मंगला हिचे पतीचा चुलत भाऊ गोटू मेसरे याच्यासोबत सूत जुळले असल्याचे समोर आले. या प्रकरणात बाळापूर पोलिसांकडून दोघांचीही कसून चौकशी करता मंगला आणि गोटू या दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान त्यांनी दोरीने गळा आवळून प्रमोदची हत्या केल्याची कबूली दिली. अखेर पोलिसांनी वहिनी आणि दिर दोघांनाही अटक केली आहे.
मंगला आणि गोटू यांचे अनैतिक प्रेमसंबंध होते. गोटू हा अविवाहित असून त्यांच्या दोघांच्या प्रेमाची कुणकुण प्रमोदला लागली होती. प्रमोदने दोघांचे भेटणं बंद केले होते. त्यामुळे प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीचा काटा काढण्याचा तिने निश्चय घेतला आणि अखेर त्यांनी पतीला संपवले.
दीर आणि वहिनीच्या हातात नको त्या कृत्यामुळे पडल्या बेड्या…
वहिनी पहाटेच्या सुमारास भांडी घासत असताना दिर जवळ गेला अन्…
हृदयद्रावक! वहिनीचे दिरासोबत प्रेमसंबंध; तीन चिमुकले अन् पोलिस…
वहिनीसोबत प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंध अन् एकदा…
वहिनी आणि मांत्रिकाचे प्रेमसंबंध; दिर बलात्कार अन् आत्महत्या…
वहिनी घरात एकटीच असल्याचे पाहून दीर घुसला घरात अन्…
The post दिराच्या प्रेमात अक्षरशः वेडी झाली वहिनी अन् पुढे तर… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

