Dailyhunt
डॉक्टर शुभांगी वानखडे यांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण.

डॉक्टर शुभांगी वानखडे यांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण.

सांगली: पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाघवाडी फाट्याजवळ मुंबईतील डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आला. महिलेने स्वतःच्या हातावर आणि गळ्यावर ब्लेडने वार करून घेत आत्महत्या केली.

दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पोलिस प्रशासनाला दिले आहेत.

डॉक्टर शुभांगी वानखडे या मुंबईतील मुलुंड पश्चिम येथील आहेत. मुंबईत एका खासगी रुग्णालयात नोकरी करीत होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरात किरकोळ कारणातून वाद सुरू होता. दोन दिवसांपूर्वी त्यांचा कुटुंबात वाद झाल्याने त्या रुग्णालयात जात असल्याचे सांगत घरातून निघाल्या. परंतु त्या रुग्णालयात न जाता पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाघवाडी फाट्याजवळ आल्या. या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या हातावर आणि गळ्यावर ब्लेडने वार करून घेत आत्महत्या केली. कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. परंतु, त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत इस्लामपूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

इस्लामपूरजवळील विठ्ठलवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) डॉक्टर शुभांगी वानखेडे (वय 44, रा. मुंबई) यांच्या आत्महत्येप्रकरणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाबाबत डॉ. गोऱ्हे यांनी सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे प्रकरणाची तातडीने व सखोल चौकशी व्हावी, असे निर्देश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. डॉ. शुभांगी वानखेडे यांचा मृतदेह 2 जुलै 2025 रोजी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्याच गाडीत संशयास्पदरित्या सापडला. त्यांच्या हातावर आणि गळ्यावर नसा कापल्याच्या गंभीर जखमा आढळून आल्या. ही आत्महत्या आहे की यामागे अन्य कोणती पार्श्वभूमी आहे, हे शोधणे अत्यावश्यक आहे, असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष, पारदर्शक आणि जलदगतीने व्हावी, अशी ठाम भूमिका विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडली आहे. ही घटना केवळ एका महिला डॉक्टरच्या आत्महत्त्येपुरती मर्यादित न राहता, समाजात अशा दुर्दैवी घटनांना आळा बसण्यासाठी संबंधित यंत्रणांनी गंभीरतेने कार्यवाही करावी, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.

महिला डॉक्टरने तणाव आणि निराशेतून केली आत्महत्या…

पुणे! भोंदूबाबाच्या आश्रमातून वेगवेगळ्या गोष्टी पोलिसांनी केल्या जप्त…

हृदयद्रावक! नवविवाहित युवतीचा बाथरूममध्ये तडफडून मृत्यू…

पुणे हादरलं! कुरिअर बॉय असल्याचे सांगून युवतीच्या तोंडावर स्प्रे मारून केला बलात्कार…

अभिनेत्रीच्या एकुलत्या एका मुलाने 57व्या मजल्यावरून मारली उडी…

शिक्षकाने केलेला अपमान विद्यार्थ्याच्या लागला जिव्हारी; चिठ्ठीत लिहिले की…

The post डॉक्टर शुभांगी वानखडे यांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka