बीड : दोन सहशिक्षकांनी मुख्यध्यापकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी गावात घडली आहे. या घटनेत मुख्यध्यापक गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शाळेतील किरकोळ वादातून दोन सहशिक्षकांनी मुख्याध्यापकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथे घडली आहे. अंबादास मल्हारी नारायणकर असे जखमी झालेल्या मुख्यध्यापकाचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नारायणकर हे गेवराई तालुक्यातील शेकटा येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक आहेत. या प्रकरणी संबंधित दोन्ही सहशिक्षकांवर गेवराई पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. किरकोळ कारणातून त्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरात शिक्षकाकडून विद्यार्थीनीला 'I Love You' चा मेसेज अन्…
शिक्षकाचे 3-3 शिक्षिकांसोबत अश्लील चाळे; Video Viral…
शिक्षक बनवायचा अश्लील व्हिडिओ, पत्नीनेच केला भांडाफोड…
गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा; शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार…
शिक्षकाने ब्लॅकमेल करत असल्याचे स्टेटस ठेवून केली आत्महत्या…
The post दोन सहशिक्षकांनी मुख्यध्यापकांवर केला प्राणघातक हल्ला… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

