Dailyhunt
एका गोणीत सापडला मृतदेह; मृतदेहाचे एकूण सात तुकडे.

एका गोणीत सापडला मृतदेह; मृतदेहाचे एकूण सात तुकडे.

मुंबई: मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोराई परिसरात गोणीत भरलेला एका मृतदेह सापडला असून, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मृतदेहाचे डोके, हात-पाय, धड वेगवेगळे करण्यात आले होते. मृतदेहाचे एकूण सात तुकडे करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हा मृतदेह नेमका कोणाचा आहे, याची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही.

गोराईच्या बाबर पाडा येथील पिक्सी रिसॉर्टला जाणाऱ्या रस्त्यावर शेफाली गावाजवळ मृतदेहाचे तुकडे असलेली ही गोणी सापडली. हा मृतदेह कोणाला सापडू नये म्हणून जंगलातील झुडुपांमध्ये ही गोणी टाकण्यात आली होती. हा मृतदेह कुजल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे नागरिकांनी आजुबाजूला शोध घेतला असता दाट झाडीत ही गोणी सापडली. यामध्ये मृतदेह असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी ही गोणी उघडली तेव्हा त्यामध्ये प्लॅस्टिकच्या डब्यात विविध अवयव भरुन ठेवल्याचे आढळून आले. या मृतदेहाचे एकूण सात तुकडे करण्यात आले आहेत. गोराई पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गोणीत सापडलेल्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम पोलिस करत आहेत. शिवाय, संबंधित व्यक्तीची हत्या कोणी केली असावी याबाबातचा तपास पोलिस करत आहेत.

पुणे शहरात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह…

संतापजनक! 2 वर्षीय मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाटणं घुसवलं अन् मारलं…

प्रेम प्रकरण! योगा टीचरला विवस्त्र करून जमिनीत पुरलं पण जिवंत बाहेर आली अन्…

धक्कादायक! मूल होत नसल्याने भोंदूबाबासह दिराने केला सामूहिक बलात्कार…

Video: हलक्या काळजाचे असाल तर हा व्हिडीओ पाहू नका…

The post एका गोणीत सापडला मृतदेह; मृतदेहाचे एकूण सात तुकडे… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka