गोंदिया : शिवशाही बस उलटून ११ जण ठार झाले आहेत, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (शुक्रवार) दुपारी १ वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील डव्वा जवळ अपघाताची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा-गोंदिया ही शिवशाही बस आज दुपारी भंडाऱ्याहून गोंदियाकडे येथे होती. बस चालकाने एका दुचाकीला ओव्हरटेक करताना डव्वा जवळ बस उलटून जवळपास २० फूट रस्त्यापासून घासत गेली. त्यामुळे बसमधील ११ प्रवाशांना मृत्यू झाला तर २९ प्रवासी जखमी झाले आहे. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
डव्वा येथील गावकऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेत बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. तसेच १०८ रुग्णवाहिका बोलावून त्यांना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच डुग्गीपार पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि मदत कार्याला सुरुवात केली आहे. जखमी व मृतक प्रवासी हे गोंदिया जिल्ह्यातीलच असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
लग्न करुन परतताना भीषण अपघात; नवरा-नवरीसह 7 जणांचा मृत्यू…
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! पुण्याहून निघालेले पती-पत्नीसह तिघे ठार…
नागपूरवरून निघालेल्या बसला भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू…
जालना येथे बस आणि ट्रकचा भीषण अपघात; 5 ठार, 14 जखमी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात पाच भाविकांचा मृत्यू तर अनेक जखमी…
The post गोंदियात शिवशाही बसला भीषण अपघात! ११ जणांचा जागीच मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

