नवी दिल्ली : विवाह सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. नवरीला हनिमूनच्या रात्री उलट्या सुरू झाल्या होत्या. संबंधित किस्सा तिने सोशल मीडियावर सांगितला असून, तो चर्चेत आला आहे.
युवतीने रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या लग्नाबाबत पोस्ट शेअर केली आहे. तिनं पोस्टमध्ये म्हटले की, आम्ही लग्न केलं त्यानंतर शहरातील बारमध्ये मोठी पार्टी करण्याचा आमचा प्लॅन होता. हनिमूनच्या रात्री पार्टी करण्याचे ठरले. त्यामध्ये काही बदल झाले. शेवटी, मी, माझा नवरा आणि त्याचे मित्र आम्ही बारमध्ये गेलो. पार्टी सुरु झाली. मी खूप ड्रिंक्स घेतल्यानंतर पाय थरथरू लागले. मी जमिनीवर पडले असते. अखेर, मला बारमधून बाहेर नेण्यात आले. दारूच्या नशेत होते. खूप उलट्या करत होते, रडत-रडत सर्वांची माफी मागत होते. माझी अवस्था पाहून बारच्या बाहेर उभ्या असलेल्या पोलिसांनी रुग्णवाहिका बोलवायचे ठरवले. पण माझ्या नवऱ्याने मला उबेर कॅबमध्ये बसवले. कॅबमध्येही मला उलट्या झाल्या. हनिमूनच्या रात्री माझा नवरा आणि मित्र मला घरी घेऊन गेले. कसेबसे मी घरी पोहचले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तेव्हा मला भयंकर डोके दुःखत होते.
‘मी नकळत केलेल्या सर्व कृती मला आठवू लागल्या. त्यामुळे मला लाज वाटू लागली. त्या रात्रीच्या आधी मी माझ्या पतीच्या मित्रांना ओळखतही नव्हते. लग्नाच्या पहिल्याच रात्री मला असं दारूच्या नशेत पाहून कसं वाटलं असेल, याचाच विचार मी करत होते. एवढंच नाही तर माझ्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. शुद्धीवर आल्यानंतर मी पुन्हा त्या लोकांशी बोललो. माझ्या कृत्याबद्दल माफी मागितली. पण माझ्यावर कोणीही रागावलं नाही. असे असूनहीं मला अजूनही स्वतःची लाज वाटते, असे युवतीने म्हटले आहे. दरम्यान, युवतीच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
हनिमूनच्या रात्री नवरदेव लागला मोठ-मोठ्याने ओरडायला…
हनिमूनच्या रात्रीच नवरीने दाखवला खरा चेहरा…
हनिमूनदरम्यान नवऱ्याच्या चुकीने नवरीचा धक्कादायक मृत्यू…
हनिमूनच्या रात्री नवऱ्याला खावू घातली गोळी अन्…
हनिमूनच्या रात्री नवरदेव मोठमोठ्याने ओरडत आला खोलीबाहेर…
हनिमूनसाठी निघालेल्या पतीला झोपेतून उठल्यावर बसला धक्का…
The post हनिमूनच्या रात्रीच नवरीला सुरू झाल्या उलट्या अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

