Dailyhunt
हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई.

हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई.

पुणे : पुणे शहरात हिट अँड रन प्रकरणात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे. पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांवर कारवाई होणार आहे.

प्रसारमाध्यमांसह सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर संबंधित प्रकरण चर्चेत राहिले आहे.

पुणे शहरातील कल्याणीनगर भागात शनिवारी (ता. १८) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास आलिशान कारने दुचाकीसह अनेक वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत धडक दिल्यामुळे अश्विनी कोष्टा, अनिस अवधिया या जणांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आता अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर देखील गुन्हा दाखल होणार आहे.

पुणे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन मुलाला मद्य देणाऱ्यावर सुद्धा कारवाई केली जाणार आहे. 17 वर्षीय अल्पवयीन युवकाने बेदरकारपणे गाडी चालवत 2 जणांचा जीव घेतला होता. या अल्पवयीन युवकाच्या वडिलांवर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. कलम 75 आणि कलम 77 जुवेनाईल जस्टिस ॲक्ट प्रमाणे कारवाई केली जाणार आहे.

कल्याणी नगर भागात झालेल्या अपघाताची पुणे पोलिसांनी पाहणी केली. आरोपीला ताब्यात घेतला असून त्याच्यावर येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडी 200 च्या स्पीडने होती अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. पबमधून पार्टी करुन परत येत असताना हा अपघात झाला. या बार आणि पबवरुन परतताना अनेक युवक मद्यप्राशन करुन गाड्या चालवतात आणि या गाड्यांचा अति वेग असतो. हाच वेग आता तरुणांच्याच जीवावर बेतताना दिसत आहे.

प्रत्यक्षदर्शींनी माहिती देताना सांगितले की, पोर्शे कारने भरधाव वेगात दुचाकीवरून जाणाऱ्या युवक-युवतीला उडवले. पोर्शे कारनं धक्का देताच दुचाकीवरील युवक पुढे असणाऱ्या कारवर आदळला. तर युवती हवेत उंच उडाली आणि रस्त्यावर पडली. युवतीचे डोके रस्त्यावर आपटल्याने रक्तस्राव होऊन जागीच गतप्राण झाली. तर युवकाचाही मृत्यू झाला. अपघातावेळी कारमध्ये तिघेजण होते अशीही माहिती समोर येत आहे. दरम्यान, मोटार चालविणाऱ्या अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर झाला आहे.

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…

पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…

पुणे शहरात 'रात्रीस खेळ चाले'; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka