संगमनेर (अहमदनगर) : अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहित दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैभव आमले (वय 22) आणि स्नेहा आमले (वय 20) असे आत्महत्या करणाऱ्या नवविवाहित दाम्पत्याचे नाव आहे.
पती-पत्नी दोघांचे मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत ग्रामस्थांना दिसले. ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून पुढे तपास सुरू केला आहे.
वैभव आणि स्नेहा आमले हे दोघेही पुण्यात नोकरी करत होते. काही दिवसांपूर्वीच दोघेही संगमनेरमधील आपल्या गावी परतले होते. त्यानंतर या दोघांनी एका झाडाला दोर बांधून एकत्रच गळफास घेतला. झाडाला लटकणारे या दोघांचे मृतदेह गावकऱ्यांच्या नजरेस पडल्यानंतर एकच खळबळ उडाली. बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिसांकडून सध्या आमले दाम्पत्याने आत्महत्या का केली, याचा तपास केला जात आहे. दोघांच्या मृतदेहाजवळ कोणतीही चिठ्ठी मिळाल्याची माहिती नाही. आमले दाम्पत्याचा दुर्दैवी अंत झाल्याने साकुर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुण्यातून गावी आल्यानंतर दोघांनी आयुष्य संपवलं आहे. त्यांनी टोकाचे पाऊल का उचललं याबाबत अद्याप कारण समजू शकलं नाही. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पोलिस नातेवाई, मित्रांची चौकशी करत आहेत.
The post हृदयद्रावक! अहमदनगर जिल्ह्यातील नवदाम्पत्याने संपवलं आयुष्य… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

