Dailyhunt
हृदयद्रावक! बहिणीची वाट पाहात असताना रस्त्यावर पाहिला मिळाला मृतदेह.

हृदयद्रावक! बहिणीची वाट पाहात असताना रस्त्यावर पाहिला मिळाला मृतदेह.

ठाणे: ठाण्यातील घोडबंदर रोडवर नागला बंदर परिसरात झालेल्या अपघातामध्ये युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे. तिच्या शरीराचे दोन भाग वेगळे झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत. गजल टुटेजा (वय २१) असे मृत युवतीचे नाव आहे.

गजल तुटेजा रविवारी रात्री 10 वाजता येथील पेट्रोल पंपाजवळून जात असताना डंपरने तिला चिरडले. गजल ही तिच्या कुटुंबातील एकटी कमावणारी होती. तिच्या मृत्यूमुळे घोडबंदर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गजलचा अपघात झाला त्या नागला बंदर परिसरात डांबरी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे गजलचे स्कुटीवरील नियंत्रण सुटून ती डंपरखाली गेल्याची शक्यता वाहतूक पोलिसांकडून वर्तविली जात आहे. डंपर अंगावरुन गेल्याने गजलच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. गजलच्या मृतदेहाला कोणीही हात लावण्यासाठी तयार नव्हते. तिचा भाऊ आणि आई घटनास्थळी आल्यानंतर आईने एका चादरीत गजलचा मृतदेह उचलून रुग्णवाहिकेत ठेवला.

गजल तुटेजा ही ठाण्यातील एका खासगी कंपनीत कामाला होती. तिला वडील नसल्यामुळे घराची जबाबदारी तिच्या खांद्यावर होती. तिच्या घरात आई आणि लहान भाऊ होता. गजल ही नोकरीसोबत पोळीभाजीचा व्यवसायही करायची. प्रचंड कष्ट करत होती. अपघाताच्या दिवशी गजलने तिचा भाऊ अक्की याला बाहेर जेवायला जाऊ असे सांगितल होते. मी दोन मिनिटांत घराच्या खाली येतेय, तू खाली ये, आपण मस्त जेवायला जाऊयात, असे गजल म्हणाली होती. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच गजलचा अपघात झाला.

गजलचा भाऊ अक्की याने रस्त्यावर पडलेला आपल्या बहिणीचा मृतदेह पाहिला. तो पेट्रोल पंपाजवळ बहिणीची वाट पाहत होता. तेव्हा त्याला रस्त्यावर प्रचंड गर्दी दिसली. तिथे जाऊन पाहिल्यानंतर अक्कीला त्याच्या बहिणीचा मृतदेह दिसला. त्याने सांगितले की, ‘मी खाली गेलो, दिदीला खूप फोन लावले, पण तिने फोन उचलला नाही, थोडे पुढे गेलो तेव्हा तिथे गर्दी दिसली मी त्या गर्दीतून वाट काढत गेलो. तेव्हा मला दिसले की, दीदीच्या अंगावरुन डंपर गेला होता तिच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. मी लगेच आईला फोन केला’, असे अक्की तुटेजा याने सांगितले.

हृदयद्रावक! नवविवाहित युवतीचा बाथरूममध्ये तडफडून मृत्यू…

हृदयद्रावक! 'साई' नावाच्या तिन मित्रांनी घेतला एकाच वेळी जगाचा निरोप…

हृदयद्रावक! नविवाहित युवतीने घेतला जगाचा निरोप; व्हॉट्सअॅपवर म्हटले की…

हृदयद्रावक! मुलाने बसमधून काढले बाहेर डोके आणि झाले धडावेगळे…

हृदयद्रावक! जिम करुन घरी परतला अन् कोसळला; नुकताच साखरपुडा…

The post हृदयद्रावक! बहिणीची वाट पाहात असताना रस्त्यावर पाहिला मिळाला मृतदेह… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka