Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हृदयद्रावक! बार्शीत क्रिकेटचा पीच तयार करताना रोल गेला अंगावरून.

हृदयद्रावक! बार्शीत क्रिकेटचा पीच तयार करताना रोल गेला अंगावरून.

सोलापूर : बार्शीतील शिवशक्ती मैदानावर आयोजित क्रिकेट समर कॅम्पमध्ये क्रिकेट पिच तयार करण्यासाठी वापरला जाणारा रोलर अंगावरून गेल्यामुळे आरव ऊर्फ वीरेन योगीराज चौधरी (वय १५) या नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी सकाळी ७ ते ७:३० च्या दरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत आरवचे वडील योगीराज चौधरी (वय ४५, रा. सुभाषनगर, बार्शी) यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवशक्ती मैदानावर बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. फी भरून आरवला कॅम्पमध्ये प्रवेश दिला होता. कोच विवेक दुगम आणि अक्षय देबडवार हे मुलांना सराव देत होते. शनिवारी सकाळी सहा वाजता आरव नेहमीप्रमाणे सरावासाठी गेल्यावर ७ ते ७:३० च्या दरम्यान १२ ते १५ वर्षाच्या मुलांकडून कोचच्या सांगण्यावरून जड रोलर ओढून घेतला जात होता. त्यावेळी जवळ कोणताही प्रशिक्षक, तंत्रज्ञ किंवा मोठी व्यक्ती उपस्थित नव्हती. कोच लांब उभे होते, असे फिर्यादीत म्हटले आहे. रोलर ओढताना आरवचा तोल गेला आणि तो खाली पडला. पायापासून छातीपर्यंत रोलर अंगावरून गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्याला तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

अल्पवयीन मुलांकडून धोकादायकपणे रोलर ओढून घेताना कोच यांनी निष्काळजीपणा केला. यामुळे मुलाचा मृत्यू झाला, असे मुलाच्या वडिलांनी जबाबात म्हटले आहे. या घटनेमुळे बार्शीत हळहळ व्यक्त होत आहे. बार्शी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक महेश गळगटे पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी जाऊन घेतला जगाचा निरोप…

हृदयद्रावक! उच्चशिक्षित महिलेने विहिरीत उडी घेऊन संपवलं आयुष्य…

हृदयद्रावक! लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधूसह तीन जणांचा अपघाती मृत्यू…

हृदयद्रावक! लग्नाच्या पत्रिकेवर ज्याचं नाव त्याच मुलावर अंत्यसंस्काराची वेळ…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka