अहिल्यानगर : लघु शंकेसाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे गुरुवारी (ता. 16) सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे. ईश्वरी पांडुरंग रोहकले असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे.
मुलीचा आवाज ऐकल्यावर वडिलांनी बचावासाठी धाव घेतली. बिबट्याच्या तावडीतून तिला सोडवण्यात यश आले. परंतु, उपचारसाठी नेले असता त्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे. या घटणेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पासरले आहे. तर दुसरीकडे बिबट्याची दहशत लक्षात घेता वन विभाग आणि संबंधित प्रशासनाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, वडिलांच्या देखत बिबट्याने मुलीवर हल्ला केला आणि मुलीचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिवाय, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
हृदयद्रावक! बिबट्या दिसल्याने स्नेहल हिने मारली विहिरीत उडी अन् गेला जीव…
Video: बिबट्याने गाठले थेट पोलिस ठाणे अन् पकडली मान…
हृदयद्रावक! विद्यार्थ्याने पेपर लिहिता लिहिताच घेतला जगाचा निरोप…
हृदयद्रावक! लग्नाला काही दिवस बाकी असतानाच मांजाने चिरला युवकाचा गळा…
हृदयद्रावक! ट्रॅक्टरच्या गिअरवर पडला पाय अन् दोन बहिणींचा चिरडून मृत्यू…
The post हृदयद्रावक! बिबट्याच्या हल्ल्यात वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुकलीचा मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

