सोलापूर: मोहोळ तालुक्यातील आष्टे गावात ट्रॅक्टरखाली चिरडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टरवर बसण्यासाठी चढत असताना गिअर पडल्याने हा प्रकार घडला आहे.
आष्टे येथे उसाच्या फडात चालू ट्रॅक्टरवर बसण्यासाठी चढण्याचा प्रयत्न करताना अचानक गिअर पडला. यामुळे ट्रॅक्टर पुढे गेला आणि लहान बहिणीसह मोठी बहीण चाकाखाली चिरडल्याने दोघींचा मृत्यू झाला. निता राजु राठोड, अतिश्री राजु राठोड असे मृत झालेल्या दोन बहिणींची नावे आहेत.
मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातून शानुबाई राज राठोड, राजु राठोड यांच्यासह पाच भाऊ भावंडे ऊस तोडणीच्या कामासाठी येथे आले होते. 7 डिसेंबर रोजी ऊसाच्या बांधवर असलेल्या ट्रॅक्टरमध्ये निता तिच्या लहान बहिणीला घेऊन चढण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी ट्रॅक्टरमध्ये चालक सुनिल गुलाब राठोड हा होता. तर ट्रॅक्टरमध्ये चढताना निताचा पाय गिअरवर पडला. यामुळे ट्रॅक्टर पुढे सरकला आणि दोन्ही बहिणींच्या अंगावरून गेला. यात दोघींचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात चालक सुनील राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या मुलींचे पालक त्यांच्या पाच मुली आणि एक मुलगा अशा 8 जणांचा ऊसतोड मजुरी करून उदरनिर्वाह करतात. ऊसाच्या बांधांवर असणारा ट्रॅक्टर चालकाने तसाच सुरु ठेवल्यामुळे निष्काळजीपणातून हा अपघात झाल्याची तक्रार या मुलींची आई शानुबाई राठोड यांनी केली होती. यावरून मोहोळ पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू राठोड हे लोकनेते साखर कारखाना अनगरच्या माध्यमातून ऊस वाहतुकीस असलेल्या ट्रॅक्टर क्रमांक एम. एच.24/डी.7147 या सोबत ऊस तोडणीचे काम करतात. ऊसाच्या बांधवर असलेला टॅक्टर क्र. एम एच. 24/डी.7147 हा चालक सुनिल गुलाब राठोड (रा. डिगरस ता. कंदार जि. नांदेड) याने तसाच चालू ठेवला होता. दरम्यान त्या ट्रॅक्टरमध्ये निता राजु राठोड (वय 20) ही लहान बहिण अतिश्री (वय 4) हिला कंबरेवर घेऊन चढ़त असताना चालू असलेल्या ट्रॅक्टरच्या गेअरवर तिचा पाय पडला. त्यामुळे अचानक गिअर पडून ट्रॅक्टर पुढे गेला. त्यामध्ये दोघीही खाली पडल्या. चालू असलेला ट्रॅक्टर दोघींच्याही अंगावरून गेला. यामध्ये त्या गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत झाल्या. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
हृदयद्रावक! पतीच्या निधनानंतर पोलिसात भरती अन् शिवशाही बस अपघातात मृत्यू…
हृदयद्रावक! बिबट्या दिसल्याने स्नेहल हिने मारली विहिरीत उडी अन् गेला जीव…
हृदयद्रावक! पती-पत्नीचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार…
हृदयद्रावक! मळणीयंत्रात डोक्याचे केस अडकल्याने शिर झाले धडावेगळे…
हृदयद्रावक Video! लेकाला वाचवण्यासाठी आई त्याच्या अंगवार पडली, बापाच्या विनवण्या…
The post हृदयद्रावक! ट्रॅक्टरच्या गिअरवर पडला पाय अन् दोन बहिणींचा चिरडून मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

