Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हृदयद्रावक! घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कॅमेरे लावून छळ; नवविवाहितेची आत्महत्या.

हृदयद्रावक! घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कॅमेरे लावून छळ; नवविवाहितेची आत्महत्या.

ठाणे : हुंडा आणि सासरच्या छळाला कंटाळून एका नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना अंबरनाथ मधून समोर आली आहे. विशाखा टिळेकर (वय 26) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.

याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी मुख्य आरोपी डॉक्टर पतीसह सासरच्या तिघांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या विकृत पतीने पत्नीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी घरात आणि घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते.

विशाखाचे कुटुंबीय आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती डॉ. नितीन टिळेकर याने अंबरनाथ येथील आपल्या घराच्या आत आणि बाहेर सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. विशाखा घरात काय करते, कुठे बसते, कोणाशी बोलते, या तिच्या प्रत्येक हालचालीवर हा डॉक्टर पती हॉस्पिटलमध्ये बसून २४ तास लक्ष ठेवत होता. तिची वैयक्तिक प्रायव्हसी पूर्णपणे हिरावून घेण्यात आली होती.

विशाखा आणि डॉ. नितीन यांचे लग्न ४८ दिवसांपूर्वी म्हणजेच ३० एप्रिल रोजी झाले होते. लग्नात अपेक्षेप्रमाणे पैसे, दागिने आणि "मान-सन्मान" मिळाला नाही, या कारणावरून सासरच्यांनी पहिल्या दिवसापासूनच टोमणे मारणे सुरू केले. "माहेरून आणखी दागिने आणि रोकड घेऊन ये," यासाठी विशाखावर सतत मानसिक दबाव टाकला जात होता. डॉक्टर पतीच्या या छळाची क्रूरता इथेच थांबली नाही. विशाखाने चुकून जरी कोणाशी संवाद साधला, तरी ती घरी आल्यावर तिला बेदम मारहाण करत होता. आत्महत्या करण्याच्या दोन दिवसांपूर्वी विशाखा घराबाहेर एका महिला शेजाऱ्याशी बोलत उभी होती. हे कृत्य पतीने सीसीटीव्हीमध्ये पाहिले आणि घरात आल्यावर तिला अत्यंत अमानुषपणे मारहाण केली. सततचा शारीरिक छळ, मानसिक छळ आणि सीसीटीव्हीच्या कैदेमुळे ती पूर्णपणे हताश झाली होती.

आत्महत्या करण्यापूर्वी विशाखाने आपल्या आईला फोन करून सासरी होत असलेल्या या अमानुष छळाची कल्पना दिली होती. मुलीची गंभीर परिस्थिती ऐकून तिचे आई-वडील तिला सासरच्या नरकातून सोडवून परत माहेरी आणण्याच्या तयारीतच होते. मात्र, ते निघण्यापूर्वीच विशाखाने घरात गळफास लावून आत्महत्या केली.

या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पती डॉ. नितीन तिळकर, सासू छाया आणि दीर निनाद यांच्याविरुद्ध हुंडाबळी, शारीरिक-मानसिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नराधम पतीला अटक केली असून, फरार सासू आणि दिराचा पोलिस कसून शोध घेत आहेत.

हृदयद्रावक! पुण्यात नोकरी मिळाली पण शाम्पूच्या पुड्यांनी घात केला; तिघींचा मृत्यू…

हृदयद्रावक! वरमाय-वरपित्यासह लग्न ठरलेल्या दुचाकीस्वार युगुलाचाही अपघाती मृत्यू…

सैराट! नवविवाहित पत्नी पोलिस भरतीसाठी परीक्षा केंद्रावर अन् पतीचा थरारक शेवट…

नवविवाहितेच्या बेडरूममध्ये लावला छुपा कॅमेरे; कोणी पाहा…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka