Dailyhunt
हृदयद्रावक! मुलांची हत्या केल्यानंतर आई-वडिलांनी घेतला गळफास.

हृदयद्रावक! मुलांची हत्या केल्यानंतर आई-वडिलांनी घेतला गळफास.

हैदराबाद: मुलगा आणि मुलीची गळा घोटून हत्या केल्यानंतर आई-वडिलांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे. सोमवारी रात्री उस्मानिया विद्यापीठ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या हबसीगुडा येथील रवींद्र नगर कॉलनीतील घरात पोलिसांना चार मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

चंद्रशेखर रेड्डी (वय 44), त्यांची पत्नी कविता (वय 35), मुलगा विश्वन रेड्डी (वय 10) आणि मुलगी श्रीता रेड्डी (वय 15) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर रेड्डी आणि त्यांची पत्नी कविता यांनी प्रथम त्यांच्या मुलाची आणि मुलीची गळा दाबून हत्या केली आणि नंतर स्वतःला गळफास लावून घेतला. श्रीता रेड्डी ही नववीत शिकणारी विद्यार्थिनी होती आणि विश्वन रेड्डी पाचवीत शिकत होता. डायल 100 वर फोन आल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना चंद्रशेखर आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह वेगवेगळ्या खोलीमध्ये सापडला. तर मुलं बेडवर मृतावस्थेत आढळली.

चंद्रशेखर रेड्डी यांनी मृत्यूआधी लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना सापडली आहे. ‘कुटुंबाच्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही, माझ्याकडे माझं कुटुंब संपवण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता, मला माफ करा. मी माझ्या करिअरमध्ये संघर्ष करत आहे. मी मानसिक आणि शारिरिकदृष्ट्या त्रस्त आहे. मला मधुमेह, मज्जातंतू आणि मूत्रपिंडाशी संबंधित समस्या आहेत,’ असे चंद्रशेखर रेड्डी यांनी या चिठ्ठीमध्ये लिहिले आहे.

दरम्यान, चंद्रशेखर रेड्डी यांनी काही महिने एका खाजगी महाविद्यालयात ज्युनियर लेक्चरर म्हणून काम केले. यानंतर सुमारे सहा महिने ते बेरोजगार राहिले. उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसल्याने कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. सध्या पोलिसांनी संशयास्पद मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून, शवविच्छेदनाचा अहवाल हाती आल्यानंतर मृत्यूचे खरं कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

हृदयद्रावक! बहिणीच्या डोळ्यादेखत लहान भावाला ट्रकने चिरडलं…

हृदयद्रावक! गतीमंद मुलीला वेदना असह्य होत असल्याने गुंगीच्या गोळ्या देऊन मारलं अन्…

हृदयद्रावक Video! बहिणीच्या लग्नात नाचताना युवतीचा मृत्यू…

हृदयद्रावक! पती-पत्नीचे भांडण अन् जीव गेला दोन चिमुकल्यांचा…

हृदयद्रावक! लग्नाला काही दिवस बाकी असतानाच मांजाने चिरला युवकाचा गळा…

The post हृदयद्रावक! मुलांची हत्या केल्यानंतर आई-वडिलांनी घेतला गळफास… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka