Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हृदयद्रावक! पती-पत्नीचे भांडण अन् जीव गेला दोन चिमुकल्यांचा.

हृदयद्रावक! पती-पत्नीचे भांडण अन् जीव गेला दोन चिमुकल्यांचा.

धुळे : पती-पत्नीच्या भांडणानंतर नवऱ्याने त्याच्या दोन चिमुकल्यांना तापी नदी पात्रात फेकून त्यांचा जीव घेतल्यानंतर घटना स्थळावरून फरार झाला आहे. थाळनेर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपी पित्याचा शोध घेत आहेत.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

धुळे जिल्ह्यातील थाळनेर गावात ही घटना घडली आहे. संजय कोळी असे आरोपी बापाचे नाव आहे. संजय कोळी याचा पत्नीसोबत वाद झाला. यानंतर संजय कोळी याने त्याच्या दोन लहान मुलांना तापी नदी पात्रात फेकून त्यांचा जीव घेतला आहे. या घटनेनंतर संजय कोळी हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.

दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना देताच त्यांनी घटनास्थळ गाठून तपास सूरू केला होता. तापी नदी पात्रात फेकून दिलेल्या त्या दोन बहिण भावाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पत्नी सोबत झालेल्या वादातून बापानेच मुलांची हत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले होते. पोलिसांनी संजय कोळीवर थाळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! शेकोटीत पडलेल्या 8 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू…

हृदयद्रावक! लग्नाला काही दिवस बाकी असतानाच मांजाने चिरला युवकाचा गळा…

हृदयद्रावक! पिंपरीमधील रिक्षा चालकाची अंगावर काटा आणणारी सुसाईड नोट…

हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यातील शिक्षक दाम्पत्यानं संपवलं जीवन…

हृदयद्रावक! सांगलीतील एकाच कुटुंबातील 6 जणांचा अपघातात जागीच मृत्यू; पाहा नावे…

The post हृदयद्रावक! पती-पत्नीचे भांडण अन् जीव गेला दोन चिमुकल्यांचा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka