तिरुअनंतपुरम (केरळ): केरळच्या मल्लापुरम येथे आपल्या मुलासोबत चाललेल्या महिलेला कारने उडवले. या धडकेच महिला गंभीर जखमी झाली आहे. या हृदयद्रावक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
अपघातानंतर चिमुकला त्याच्या आईला उठवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक महिला रस्त्याच्या कडेला तिच्या मुलासह चालताना दिसत आहे. त्यावेळी मागच्या दिशेने एक कार वेगाने येते आणि महिलेला उडवते. अपघात एवढा जोरदार होता की ती महिला काही फूट उडाली आणि रस्त्यावर पडली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे. तर तिच्यासोबत असलेला मुलगा थोडक्यात बचावला आहे.
दरम्यान, अपघातानंतर चिमुकला आईच्या दिशेने जाऊन तिला उठवण्याचा प्रयत्न करतो. अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोकही मदतीला धावले. नागरिकांनी महिलेला रुग्णालयात दाखल केले. पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे घटनेचा तपास करत आहेत.
हृदयद्रावक! नाशिकमध्ये भावासमोरच बहिणीने सोडला प्राण…
हृदयद्रावक! मुलगी IAS झाल्याचे पेढे वाटताना वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू…
बीड! शिक्षकानं हृदयद्रावक पोस्ट लिहून संपवलं आयुष्य; मुंडेंनी खूप छळ केला…
हृदयद्रावक! बहिणीच्या डोळ्यादेखत लहान भावाला ट्रकने चिरडलं…
हृदयद्रावक Video! बहिणीच्या लग्नात नाचताना युवतीचा मृत्यू…
The post हृदयद्रावक Video: महिलेला कारने उडवले; आईला वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

