नागपूर : सिगारेट ओढताना व्हिडिओ घेतल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन युवतींनी आपल्या मित्रांच्या मदतीने एका युवकाला बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या महालक्ष्मी नगरमध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली.
मृत युवक रणजितचे कपड्याचे दुकान आहे. रणजित 6 एप्रिलच्या रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास सिद्धेश्वर सभागृहाजवळ असलेल्या पानठेल्या जवळ उभा होता. दरम्यान, त्या ठिकाणी जयश्री ही आपल्या मैत्रीण सविता सोबत तेथे आली आणि तेथून सिगारेट विकत घेतली. त्यानंतर त्या दोघी त्याच ठिकाणी सिगरेट ओढत होत्या. दरम्यान यावेळी तेथे उपस्थित असलेल्या रणजितने कुतूहलाने जयश्रीकडे पाहिले तसेच सिगारेट ओढनाऱ्या जयश्रीचा व्हिडिओही त्याने घेतला. रणजितने मागे वळून पाहताच जयश्रीने सिगारेटचा धूर रणजितच्या तोंडावर सोडला. यामुळे रागाने रणजितने तिला टोमणा मारला. यातून दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा जयश्री तिथून निघून गेली. मात्र थोड्या वेळाने सविता सायरे, आकाश राऊत आणि आणखी एक मित्र सोबत घेऊन जयश्री पान टपरीजवळ आली. तिथेच रणजितवर हल्ला केला.
आकाश आणि त्याच्या इतर साथीदारांनी मिळून रणजितवर धारधार शस्त्र आणि दगडांनी हल्ला केला. या हल्ल्यात रणजित गंभीर जखमी झाला असल्याचे बघून मारेकऱ्यांनी घटणास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळातच त्यांनी तात्काळ घटणास्थळ गाठून जखमी रणजितला रुग्णालयात नेले. मात्र, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली असता, या परिसरात लागलेले सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्ही पाहिल्यावर घडलेला संपूर्ण प्रकार स्पष्ट झाला. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी दोन युवतींसह तीन संशयित आरोपींना अटक केली असून, पुढील कारवाई पोलिस करत आहेत.
पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…
हृदयद्रावक! पतीच्या निधनाच्या धक्क्याने पत्नीची आत्महत्या; चिमुकली पोरकी…
आमदाराच्या पीएला रस्त्यावर खेचत केली बेदम मारहाण; कारण…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post जयश्रीने सिगारेटचा धूर रणजितच्या तोंडावर सोडला अन् झाली हत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

