नांदेड : पतीचे अपघातात निधन झाल्याचे समजल्यानंतर धक्का बसलेल्या पत्नीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना नायगाव तालुक्यात घडली आहे. पती-पत्नीच्या अचानक जाण्यामुळे अडीच वर्षांची चिमुकली पोरकी झाली आहे.
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
स्नेहा बेंद्रीकर असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे. त्यांच्या पतीचा शनिवारी रात्री घरी परतताना अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर रात्री उशिरा पत्नीनेसुद्धा आत्महत्या केली. स्नेहा यांचे पती अरुण बेंद्रिकर हे विष्णुपुरी येथून घरी परत येत होते. त्यांच्या दुचाकीला कहाळा-गडगा येथे अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अरुण यांचा जागीच मृत्यू झाला. अरुण यांचे अपघातात जागीच निधन झाल्यानंतर त्यांच्या खिशात असणाऱ्या ओळखपत्राच्या आधारे माहिती घेऊन पत्नीला याबाबत सांगण्यात आले होते. पत्नी स्नेहा यांना पती अरुण यांच्या निधनाची माहिती मिळताच जबर धक्का बसला. यातूनच त्यांनी रात्री उशिरा घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. स्नेहा यांचे पती अरुण हे महावितरणमध्ये कर्मचारी होते. दोघांना अडीच वर्षांची मुलगी आहे. अडीच वर्षांची चिमुकली पोरकी झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्नेहा बेंद्रीकर यांनी रात्री दीड वाजेदरम्यान घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. या दाम्पत्याच्या पार्थिव देहांवर बेंद्री येथे आज (रविवार) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, रात्री दीडच्या सुमारास काही महिला तिच्यासोबत बसलेल्या होत्या. मात्र मुलीला पिण्यासाठी दूध देउन येते असे म्हणून ती एका खोलीमध्ये गेली. मुलीला पिण्यासाठी दूध दिले, मुलीचे दूध संपण्या अगोदरच तिने गळफास लावून आत्महत्या केली.
हृदयद्रावक! मायलेकीचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी केला आक्रोश…
हृदयद्रावक! चिमुकल्याला आईसमोरच जमिनीवर जोरात फेकले…
हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील चिमुकल्यासह 7 जणांचा होरपळून मृत्यू; अश्रू अनावर…
हृदयद्रावक! डॉक्टर होणाऱ्या पत्नीला भेटून आला अन् काळाने घातला घाला…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post हृदयद्रावक! पतीच्या निधनाच्या धक्क्याने पत्नीची आत्महत्या; चिमुकली पोरकी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

