Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन.

मुंबईः आपल्या जादूई आवाजाने अनेक दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका ज्येष्ठ गायिका आशा भोसले (वय ९२) यांचे आज (रविवार) निधन झाले आहे.

प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना शनिवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आशा भोसले यांच्या पार्थिवावर सोमवारी (१३ एप्रिल) रोजी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टी आणि संगीत क्षेत्रातील एका पर्वाची अखेर झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

 Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

भारतरत्न आणि ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकर यांची लहान बहीण असलेल्या आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखले जायचे. तब्बल सहा दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिला. त्यांनी केवळ हिंदीतच नाहीतर, मराठी, बंगाली, गुजराती, तमिल, तेलुगुसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आरडी बर्मन, ओपी नैय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली. ‘दम मारो दम’ आणि ‘ओम शांति ओम’ यांसारखी अनेक सुपरहिट गाणी आशा भोसले यांनी इंडस्ट्रीला दिली आहेत.

आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी माध्यमांसमोर येऊन आशा ताईंच्या निधनाची बातमी साश्रू नयनांनी दिली. तसेच, आशाताईंवर उद्या (सोमवारी) सकाळी अकरा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत त्यांचं अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर आशा भोसले यांची अंत्ययात्रा निघेल आणि सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान, दिग्गज गायिकेच्या निधनानं संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. अशातच ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवाला हिचा मृत्यू; स्वप्न राहिले अपूर्ण…

पुणे! नवले पूल अपघतात अभिनेत्याचा मृत्यू! चिमुकला झाला पोरका…

पिंजरा! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka