कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे एका १५ वर्षीय मुलीची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित मुलगी मंदिर परिसरात असताना अज्ञात हल्लेखोराने तिच्या गळ्यावर वार केला.
हा वार इतका गंभीर होता की यात मुलीचा गळा अर्धा चिरला. या भयावह हल्ल्यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. ऐन नवरात्री उत्सवाच्या काळात मुलीचा अशाप्रकारे खून झाल्याने माणगावात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील सांस्कृतिक भवनासमोरील मंदिर परिसरात मुलीवर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. ही घटना शनिवार रात्री ९ च्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. पथकाकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून संशयिताच्या शोधासाठी पोलिसांचं पथक शोध मोहीम राबवत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी नववीच्या वर्गात शिकत होती. संशयिताने मंदिर परिसरात सुरू असलेल्या स्पीकरच्या आवाजात संबंधित मुलीच्या गळ्यावर धारदार शास्त्राने वार केला. वार इतका जोरदार होता की मुलीचा गळा निम्मा चिरला. शिवाय दंडावर वार झाल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला. मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. मुलीला इचलकरंजी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. तपासणी नंतर वैद्यकीय पथकाने मुलीस मृत घोषीत केले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
कोल्हापूर! लग्न ठरल्याने प्रेयसीला कड्यावरून ढकलून खून; प्रियकराने सांगितले…
कोल्हापूर! वहिनी घरात एकटीच असताना दीर आला अन्…
कोल्हापूर! प्रियकराने केलेल्या माजी सरपंचबाईंच्या हत्येत आला नवा ट्विस्ट…
कोल्हापूर! महाविद्यालयीन युवतीवर प्रियकरासह चौघांचा अत्याचार; Video बनवला अन्…
कोल्हापूर! मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला लैंगिक अत्याचार…

