Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कोल्हापूर! वहिनी घरात एकटीच असताना दीर आला अन्.

कोल्हापूर! वहिनी घरात एकटीच असताना दीर आला अन्.

कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे चुलत दिराने वहिनीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणात मृत पूजा दाभाडे हिचे पती अविनाश यांनी कोडोली पोलिसांत एकतर्फी प्रेमातून खून झाल्याची फिर्याद दिली आहे.

संशयित आरोपी सुरेश दाभाडे (वय 38) हा फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काखेपैकी शाहूनगर वसाहत येथील आरोपी सुरेश दाभाडे याचे भावजय पूजा दाभाडे हिच्याशी प्रेमसंबंध होते. त्यातून ते दोघेजण कराडला सहा महिने एकत्र राहत होते. मे 2026 मध्ये दोघेजण पुन्हा गावाकडे परत आले. त्यानंतर पूजा पतीकडे राहण्यास आली होती. परंतु, आरोपी सुरेश दाभाडे हा पूजाला वारंवार त्रास देत होता. याबाबत पूजाचे पती अविनाश यांनी कोडोली पोलिस ठाण्यात सुरेश याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

पूजा बुधवारी दुपारी घरात एकटीच असताना सुरेश हा तिच्या घरी आला. त्याने दारातूनच पूजाला शिवीगाळ सुरू केली. तेव्हा ती बाहेर आली आणि दोघांचा वाद सुरू झाला. सुरेश याने धारदार शस्त्राने पूजाच्या शरीरावर 16 वार केले. पूजा आरडाओरडा करत प्रतिकार करत होती. मात्र, घाव वर्मी लागल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. शेजाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पण तोपर्यंत सुरेशने तिथून पळ काढला होता. जखमी अवस्थेतील पूजाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, उपचारादरम्यानच पूजाचा मृत्यू झाला. पूजा हिच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

दरम्यान, पूजा हिच्या मृत्यूनंतर नातेवाईक आक्रमक झाले. आरोपीला अटक केल्याशिवाय तसेच संबंधित दोषी पोलिसावर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे कोडोली ग्रामीण रुग्णालयात वातावरण तणावपूर्ण झाले होते. पोलिस अधिकाऱ्यांनी नातेवाईकांची समजूत काढत संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुंबईत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी वहिणीचा लहान दिरावर दबाव…

प्रेमसंबंध! दीर पहाटेच्या सुमारास वहिनीच्या खोलीत घुसला अन्…

प्रेमसंबंधातून वहिनीची हत्या करुन रस्त्यावर नग्न धावला दीर अन्…

जालना हादरलं! वहिणी-दिराचे प्रेमसंबंध अन् जीव गेला नवऱ्याचा…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka