कोल्हापूर : आईच्या निधनानंतर विरह सहन न झाल्याने उच्चशिक्षित सख्या बहिण भावाने राजाराम तलावात उडी घेत जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन्ही भावडांनी आपल्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरू नये, असे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.
कोल्हापूर शहरातील संभाजीनगर परिसरातील नाळे कॉलनीत राहणाऱ्या भूषण निळकंठ कुलकर्णी आणि भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी या सख्ख्या भावडांनी राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. दोघेही अविवाहित होते. आई पद्मजा निळकंठ कुलकर्णी यांचे अडीच महिन्यांपूर्वी निधन झाले होते. आईच्या निधनानंतर भूषण आणि भाग्यश्री हे दोघेही बहिण भाऊ नैराश्येत होते. त्यांची सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.
आई पद्मजा निळकंठ कुलकर्णी यांचे मे 2024 मध्ये निधन झाले होते. यानंतर भूषण निळकंठ कुलकर्णी आणि भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी हे दोघेही बहिण भाऊ नैराश्येत होते. अनेक जणांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही बहिण भाऊ आईच्या आठवणीतून बाहेर पडत नव्हते. दोघेही उच्चशिक्षित असून अविवाहित होते. अखेर विरह सहन न झाल्याने या दोन्ही सख्या बहिण भावानी राजाराम तलावात उडी घेत आत्महत्या केली. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. आमच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार ठरवू नये, असेही या सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवले आहे. उच्चशिक्षित असेलल्या भूषण आणि भाग्यश्री यांच्या या टोकाच्या निर्णयाबद्दल संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हृदयद्रावक! घराची खिडकी उचकटली अन् वडिलांनी फोडला टाहो…
हृदयद्रावक! अहमदनगर जिल्ह्यातील नवदाम्पत्याने संपवलं आयुष्य…
हृदयद्रावक! कुत्रा चिमुकलीच्या अंगावर आदळल्याने मृत्यू तर कुत्रा…
हृदयद्रावक! 'सॉरी बेटा, काळजी घे' असे म्हणून समुद्रात झोकून दिलं…
हृदयद्रावक! उच्चशिक्षित युवकाने घेतला जगाचा निरोप; सुसाईड नोटमध्ये भावनिक…
हृदयद्रावक! बापलेकाने एकमेकांना घट्ट मिठी मारून रेल्वेखाली केली आत्महत्या…
The post कोल्हापुरात उच्चशिक्षित बहिण-भावाने घेतला जगाचा निरोप; हृदयद्रावक सुसाईड नोट… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

