छत्रपती संभाजीनगर : क्रिकेट खेळत असताना इम्रान सिकंदर पटेल हा अचानक खाली कोसळला होता. त्यानंतर त्याला तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर लकी बिल्डर्स अॅड डेव्हलपर्स आणि यंग इलेव्हन यांच्यात सामना सुरू होता. या सामन्यात लकी संघाचा कर्णधार इम्रान पटेल याने सहाव्या षटकात दोन खणखणीत चौकार मारले. त्यानंतर इम्रानने माझा गळा आणि हात दुखतोय, मी बाहेर जाऊन औषधाची गोळी घेऊन येतो, असे पंचाना सांगितले. यावेळी त्यांनी तत्काळ रूग्णालयात जा, असा सल्ला दिला. त्यानंतर मैदान सोडताच इम्रान पटेल सीमारेषेजवळ अचानक कोसळला. इम्रान पटेल कोसळल्याचे पाहून खेळाडूंनी त्याच्याकडे धाव घेतली. त्यानंतर त्याला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.
दरम्यान, इम्रान पटेल हा छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध युवा क्रिकेटपटू होता. गरवारे स्टेडियमवर सामना सुरू असताना शेवटच्या षटकात अखेरच्या चेंडूवर चौकार मारले होते. त्यानंतर त्याला अचानक छातीत दुखू लागले आणि पाचच मिनिटात त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे इम्रान पटेल यांच्या निधनाने संभाजीनगर आणि क्रिकेटप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
पायलट युवतीच्या आत्महत्येबद्दल पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर…
माजी क्रिकेटपटू सलील अंकोला याच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह…
Video: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा दुसरा व्हिडिओ आला समोर…
मुंबई पोलिसकाकाचा चाळीसगावात क्रिकेटच्या वादातून खून…
The post क्रिकेटपटूने दोन खणखणीत चौकार मारले अन् घेतला जगाचा निरोप… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

