Dailyhunt
लग्न लावून देत नसल्याने दोन भावांनी बापाला कायमचं संपवलं.

लग्न लावून देत नसल्याने दोन भावांनी बापाला कायमचं संपवलं.

त्रपती संभाजीनगर : वडील लग्न करुन देत नाहीत म्हणून दोन मुलांनी बापावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना वडगाव कोल्हाटी येथे घडली. या घटनेत संपत वाहूळ (वय ४८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पोपट वाहूळ आणि प्रकाश वाहूळ या दोघांना वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

संपत वाहुळ हे वडगाव कोल्हाटी येथे आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांचा मुलगा पोपट वाहुळ (28) आणि प्रकाश वाहुळ (26) ही दोन्ही मुले एका कंपनीत काम करत आहेत. लहान मुलगा प्रकाश कामावरून घरी आला होता. त्यावेळी वडील संपत वाहुळे हे घरात एकटेच होती. कामावरून आल्याबरोबर त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि नंतर बुटाने वडिलांना मारहाण केली. त्यानंतर मोठा मुलगा पोपट देखील कामावरून आला. त्याने देखील वडिलांना आमचे वय वाढत आहे, तरी सुद्धा आमच्या लग्नाचे मनावर का घेत नाही, अशी विचारणा केली. त्यावर वडिलांनी तुम्ही दोघेही नीट वागत नाही, असे सांगितले.

वडिलांचे उत्तर ऐकून दोन्ही मुलांचा राग अनावर झाला. मोठा मुलगा प्रकाशने जवळील चाकू काढत वडिलांवर सपासप वार केले. बापाने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. जीव वाचवण्याासाठी ते बाहेर पळाले तर मोठ्या मुलाने पकडले आणि लहान मुलाने त्यांच्यावर वार केले. आरडा ओरड ऐकून संपत वाहुळ यांचे भाऊ रामनाथ वाहुल, संजय वाहुळ, आकाश व संदीप वाहुळ हे मदतीस धाऊन आले, त्यावेळी हा आता वाचला तर गोळी घालून मारून टाकू अशी धमकी मुलांनी दिली. यामध्ये ते रक्तबंबाळ झाले. त्यानंतर संपत वाहुळ यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी दोन्ही मुलांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपचार सुरू असतांना 23 मे रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुढील तापास पोलिस करत आहे.

हृदयद्रावक Video! वलिडांना अमानुषपणे केली मारहाण, सोडला जीव…

संतापजनक! बापाने चिमुकलीच्या तोंडात तंबाखू देऊन केली हत्या…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या धनिकपुत्राची बाल सुधारगृहात रवानगी; पाहा दिनक्रम…

मामाच्या मुलीसाठी सख्ख्या भावांची हाणामारी; पण तिचं प्रेम…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post लग्न लावून देत नसल्याने दोन भावांनी बापाला कायमचं संपवलं… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka