Dailyhunt
हृदयद्रावक Video! वलिडांना अमानुषपणे केली मारहाण, सोडला जीव.

हृदयद्रावक Video! वलिडांना अमानुषपणे केली मारहाण, सोडला जीव.

चेन्नई : मालमत्तेच्या हव्यासापायी मुलाने वृद्ध पित्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बेदम मारहाण झाल्यामुळे वडिलांनी जीव सोडला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, मुलाला अटक केली आहे.

तामिळनाडूतील पेरांबलूर जिल्ह्यातील कृष्णपुरम येथे 16 फेब्रुवारी रोजी के संतोष (वय ४०) याने मालमत्तेच्या वादातून वडील ए कुलंदाइवेलू (वय ६३) यांना अमानुषपणे बेदम मारहाण केली. वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मात्र, वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूमध्ये मुलाचा हात असल्याचा संशय निर्माण झाला. यातूनच ही घटना उघडकीस आली आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळते की, वडील कुलंथाइवेलू एका बाकड्यावर बसलेले दिसत आहेत. त्यानंतर त्यांचा मुलगा संतोष तिथे येतो आणि त्याच्या वडिलांवर एकामागोमाग एक बुक्क्यांनी बेदम मारहाण करतो. दुसरा व्यक्ती तेथे आल्यानंतर संतोषला तिथून घेऊन जातो. मात्र, त्याआधीच बाकड्यावर बसलेला वृद्ध व्यक्त बेशुद्ध झालेला दिसत आहे. 16 एप्रिलला मारहाण केल्यानंतर वडील कुलंदाइवेलू यांनी मुलगा संतोष याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती, मात्र त्यांनी नंतर तक्रार मागे घेतली. यानंतर कुलंदैवेलू यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने 18 एप्रिल रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी मुलगा संतोषविरुद्ध पुन्हा एकदा तक्रार दाखल केली.

भारतीय दंड संहितेच्या कलम 323 (स्वच्छेने दुखापत करण्यासाठी शिक्षा), 324 (स्वच्छेने धोकादायक शस्त्राने दुखापत करणे), आणि 506 (ii) (गुन्हेगारी धमकावण्याची शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यानंतर आरोपी मुलगा संतोष याला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! पती-पत्नीमध्ये मध्यरात्री वाद झाला अन् घेतला नको तो निर्णय…

हृदयद्रावक! मायलेकीचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी केला आक्रोश…

हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील चिमुकल्यासह 7 जणांचा होरपळून मृत्यू; अश्रू अनावर…

हृदयद्रावक! एक चिमुकली पाण्यात पडली अन् पुढे तिघींचा मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post हृदयद्रावक Video! वलिडांना अमानुषपणे केली मारहाण, सोडला जीव… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka