Dailyhunt
लातूर! सुटकेसमध्ये मृतावस्थेत आढळला युवतीचा मृतदेह.

लातूर! सुटकेसमध्ये मृतावस्थेत आढळला युवतीचा मृतदेह.

लातूर: लातूर जिल्ह्यातील वाढवणा-चाकूर रोडवर शेळगाव परिसराजवळ असलेल्या तिरु नदीच्या बाजूला झुडपात एक बॅग आढळली आहे. या बॅगेत अज्ञात युवतीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात लांबपर्यंत दुर्गंधी पसरली होती. परिसरातील एका शेतकऱ्याने शोध घेतल्यानंतर ही भयानक घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. चाकूर आणि वाढवणा पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेहाची अवस्था पाहता, महिलेची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तो बॅगेत भरून झुडपात फेकून दिला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलिस, वाढवणा पोलिस स्टेशनचे अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) पथक आणि मोबाईल व्हॅन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मृतदेह कोणाचा आहे, या खुनामागचं नेमकं कारण काय आणि मारेकरी कोण आहे? याचा कसून तपास सुरू आहे. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलिस करत आहेत.

शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; रात्रीच्या वेळी भेटायला बोलवायचा अन्…

पुणे ! प्रेयसीच्या मानलेल्या भावाचा कात्रज घाटात केला खून…

एक प्रियकर अन् दोन मैत्रिणी! महिला होमगार्डच्या खूनाचा उलगडा…

बीड! सरकारी वकिलाने न्यायालयातच घेतला गळफास; मोठा ट्विस्ट…

पुणे! दामिनी मार्शल सोनाली हिंगे यांची तत्परता अन् कुटुंब आले एकत्र…

The post लातूर! सुटकेसमध्ये मृतावस्थेत आढळला युवतीचा मृतदेह… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka