Dailyhunt
लिव्ह इनमधील प्रेयसीचा खून केला अन् मुलाला आळंदीत सोडलं.

लिव्ह इनमधील प्रेयसीचा खून केला अन् मुलाला आळंदीत सोडलं.

पुणे : प्रियकराने प्रेयसीची हत्या करून मृतदेह पुणे-बेंगलोर महामार्गावरील खंबाटकी घाटात फेकून दिला. नंतर स्वतःचं पोलिस स्टेशनमध्ये जाऊन प्रेयसी हरवल्याची तक्रार दिली. मात्र, पोलिस तपासात प्रियकराचे बिंग फुटले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील ही धक्कादायक घटना नुकतीच समोर आलीये. सतत पैसे मागणे आणि चारित्र्याच्या संशयावरून ही घटना घडली आहे. दिनेश ठोंबरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. जयश्री मोरे अस हत्या झालेल्या प्रेयसीचे नाव होते. हत्येनंतर दिनेशने तीन वर्षीय बाळाला आळंदीत सोडून दिले अन् स्वतः पसार झाला होता.

दिनेश याचे आधी एक लग्न झालेल होते. त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आहेत. जयश्रीचा सुद्धा विवाह झाला होता. पण, दिनेशचा त्याच्या पत्नीसोबतचा आणि जयश्रीचा तिच्या पती सोबतचा संसार टिकला नाही. जयश्री आणि दिनेश एकमेकांच्या संपर्कात आले. दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघे वाकड परिसरात लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागले. तीन वर्षांपूर्वी दोघांना एका मुलगा झाला. पण, पुढे दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले. जयश्री नेहमी दिनेशकडे पैशांची मागणी करायची. पैसे दिले नाही तर मी सोडून जाईन, असा तगादा लावत होती. वारंवार होणाऱ्या या वादातून मुक्त व्हायचे त्याने ठरवले. 24 नोव्हेंबर रोजी भुमकर चौकाजवळ गाडीत दोघांमध्ये वाद झाले. तेंव्हा गाडीतील हातोडा घेऊन, दिनेशने जयश्रीच्या डोक्यात घाव घातला. मोठा रक्तस्त्राव झाल्यामुळे जयश्रीचा मृत्यू झाला.

दिनेशने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी थेट पुणे-बेंगलोर महामार्गावरील खंबाटकी घाट गाठला आणि त्या घाटात जयश्रीचा मृतदेह फेकून दिला. दिनेश पुन्हा पिंपरी-चिंचवड परतला आणि दुसऱ्या दिवशी प्रेयसी जयश्री बेपत्ता असल्याची वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तितक्यात जयश्री हिचे वर्णन असलेल्या महिलेचा मृतदेह मिळाल्याची बातमी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवल्यानंतर यामागे दिनेश असल्याचे निष्पन्न झाले. पुढच्या तपासात दिनेशने तीन वर्षीय मुलाला आळंदीत बेवारस सोडून दिल्याचे समोर आले. याप्रकरणी दिनेशला वाकड पोलिसांनी अटक केली असून, दिनेशचे बिंग फुटले. पोलिसांनी गुन्हा उघड केला आहे.

धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन…

पायलट युवतीच्या आत्महत्येबद्दल पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर…

धक्कादायक! पुणे शहराजवळ कोयत्याने सपासप वार करुन एकाची हत्या…

नांदेडमधील 'त्या' थरारक खुनाचा पोलिसांनी केला उलगडा…

जळगावमध्ये संशयावरून चिमुकल्यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या; पुत्नीची मृत्यूशी झुंज सुरू…

The post लिव्ह इनमधील प्रेयसीचा खून केला अन् मुलाला आळंदीत सोडलं… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka