Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नांदेडमधील 'त्या' थरारक खुनाचा पोलिसांनी केला उलगडा.

नांदेडमधील 'त्या' थरारक खुनाचा पोलिसांनी केला उलगडा.

नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या बारड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी एका युवकाचा खून झाला होता. संबंधितखुनाचा पोलिसांनी उलघडा केला आहे. अनैतिक संबंधाच्या कारणावरून सख्ख्या भावानेच आपल्या मेव्हण्याच्या मदतीने भावाचा खून केल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी हरप्रिंतसिंग उर्फ हॅपी कुलवंतसिंग चाहेल आणि ईश्वरसिंग जयवंतसिंग गिरणीवाले यांना अटक केली आहे.

तेजपालसिंग उर्फ जेसुसिंग चाहेल (वय ३८) या युवकाचा त्रिकूट येथील गोदावरी नदीकाठी मृतदेह सापडला होता. शरीरावर आणि डोक्यावर गंभीर जखमा पोलिसांना आढळून आल्या होत्या. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि मयताचा भाऊ हरप्रितसिंग चाहेल याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता हरप्रितसिंग यानेच भावाचा खून केल्याची कबुली दिली. मयत तेजूसिंग याचे आरोपी भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. ही बाब समजल्यानंतर हरप्रितसिंग याने भावाचा काटा काढण्याचे ठरवले. आरोपीने मेव्हणा ईश्वरसिंग गिरणीवाले याला देखील माहिती दिली. त्यानंतर रविवारी रात्री दोघांनी तेजूसिंग याला बारड शिवारातील त्रिकुट येथे नेले. यावेळी काठीने आणि बेल्टने त्याला जबर मारहाण केली. डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी तपास करून खुनाचा उलगडा केला आहे. जगमीरसिंग यांच्या तक्रारीवरून आरोपी हरप्रिंतसिंग उर्फ हॅपी कुलवंतसिंग चाहेल आणि ईश्वरसिंग जयवंतसिंग गिरणीवाले या दोघांविरोधात बारड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मयत तेजूसिंग हा नांदेड शहरातील कौठा येथील रहिवासी होता. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल होते. शिवाय तो सर्पमित्र म्हणून तो काम करायचा. दरम्यान, अनैतिक संबंधातून घडलेल्या या प्रकाराने नांदेड शहरात खळबळ उडाली आहे.

जळगावमध्ये संशयावरून चिमुकल्यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या; पुत्नीची मृत्यूशी झुंज सुरू…

Video: पुणे ग्रामीण पोलिसांनी स्मशानभुमी मधील लाकडावरुन उघड केला खुनाचा गुन्हा…

अनैतिक संबंधाच्या संशयावरून चिमुकल्यासमोरच पत्नीचा दाबला गळा…

Video: प्रेयसीला दुसऱ्या मुलासोबत पकडले रंगेहात अन् भररस्त्यातच…

धक्कादायक! दत्तक घेतलेल्या मुलासोबतच ठेवले अनैतिक संबंध अन् पुढे…

The post नांदेडमधील ‘त्या’ थरारक खुनाचा पोलिसांनी केला उलगडा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka