Dailyhunt
महालक्ष्मीच्या मृतदेहाचे 50 तुकडे करणाऱ्या आरोपीची आत्महत्या अन्.

महालक्ष्मीच्या मृतदेहाचे 50 तुकडे करणाऱ्या आरोपीची आत्महत्या अन्.

वी दिल्ली : बंगळुरूत महालक्ष्मी नावाच्या महिलेची हत्या करून मृतदेहाचे 50 तुकडे फ्रीजमध्ये ठेवल्याच्या घटना उघड झाल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपीने ओडिशात झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे.

आत्महत्येपूर्वी एक सुसाइड नोटही लिहिली आहे.

आरोपी मुक्ती रंजनचा मृतदेह ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील एका गावात आढळून आला आहे. मुक्ती रंजन हा महालक्ष्मीच्या हत्येच्या घटनेनंतर फरार होता. स्थानिक पोलिसांनी त्याने आत्महत्या केल्याची माहिती बंगळुरू पोलिसांना दिली आहे. रंजन मंगळवारी त्याच्या गावी पोहोचला होता. त्यानंतर तो घरातून बाहेर गेला ते परतलाच नाही. त्याचा मृतदेह गावाबाहेर एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. कुटुंबियांनी मृतदेहाची ओळख पटवली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी चौकशी केली जात आहे.

ओडिशाच्या अतिरिक्त महासंचालकांनी सांगितले की, पोलिसांना सुसाइड नोट सापडली आहे. आरोपीने यामध्ये महालक्ष्मीची हत्या केल्याचे म्हटले आहे. त्याच्या मृत्यू प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. सुसाइड नोटच्या आधारे बंगळुरू पोलिसांनी मुक्ती रंजनच महालक्ष्मी हत्याकांडाचा आरोपी असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, महालक्ष्मी एक सेल्सवुमन म्हणून काम करत होती. आरोपी तिच्यासोबत काम करायचा. मुक्ती रंजनला महालाक्ष्मीच्या दुसऱ्या व्यक्तीसोबतच्या संबंधावर आक्षेप होता. त्यातून दोघांमध्ये वाद होत असत. महालक्ष्मी १ सप्टेंबरला शेवटची कामावर आली होती. त्यानंतर तिचा फोन बंद होता. २१ सप्टेंबरला तिची बहीण आणि आई ती जिथे राहत होती तिथी गेली तर मृतदेह फ्रीजमध्ये आढळून आला. मृतदेह अनेक तुकड्यांमध्ये होता आणि त्यात अळ्या झाल्या होत्या. महालक्ष्मी तिच्या पतीपासून वेगळी राहत होती. तिला ४ वर्षांची एक मुलगी आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

श्रद्धा वालकर खून प्रकरणाची पुनरावृत्ती; युवतीच्या मृतदेहाचे ३० तुकडे अन्…

सेवानिवृत्त शिक्षकाने अनैतिक संबधाच्या संशयावरून पत्नीचे केले ५७ तुकडे…

अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचे दहन नाही तर दफन केले जाणार; कारण…

मोटारीवर पक्षाचा झेंडा अन् मोटारीच्या आतमध्ये एक महिला अन् सहा पुरूष…

पुणे शहरात 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने केला बलात्कार…

The post महालक्ष्मीच्या मृतदेहाचे 50 तुकडे करणाऱ्या आरोपीची आत्महत्या अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka