छत्रपती संभाजीनगर: ओव्हरगावमध्ये जमिनीवरील ताब्यावरून अनेक वर्षापासून सुरू असलेल्या वादातून अकरा जणांच्या टोळीने जटवाडा रस्त्यावरील ओव्हरगावचे माजी सरपंच दादा सांहू पठाण यांची क्रूरपणे हत्या केली आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पठाण यांच्या कुटुंबातील महिला हल्लेखोरांना हात जोडून वाद मिटवण्यासाठी विनवण्या करत असताना टोळीने लाठ्याकाठ्या, लाथांनी पठाण यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर घाव घातले. दादा पठाण यांचा मृत्यू झाला. रात्री एकास अटक झाली. बाकीचे हल्लेखोर पसार आहेत. इम्रान खान मोईन खान पठाण, जमीर इनायत खान पठाण, मोसीन मोईन खान पठाण, अफरोज खान गयाज खान, अस्लम गयाज पठाण ऊर्फ गुड्डू, हैदर खान गयाज खान पठाण, समीर जमीर पठाण, उमेर जमीर पठाण, फुरकान अजगर पठाण, रामअवतार सागरमल साबू, मोईन इनायत खान पठाण अशी हल्लेखोरांची नावे आहेत.

पठाण यांचे कुटुंब मूळ ओव्हरगातचेच असून, घरासमोरच त्यांची शेती आहे. काही अंतरावर शाळेजवळ त्यांची जमीन आहे. या जमिनीच्या शेजारून एक वाट जाते. सुरुवातीला आरोपींच्या टोळीने या छोट्या वाटेवरून वाद घालण्यास सुरुवात केली. कालांतराने पूर्ण जमिनीवरच दावा करण्यास सुरुवात केली. यातून अनेकदा वाद झाले. बुधवारी पठाण यांनी जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी जेसीबी बोलावला. दहा ते अकरा जणांच्या टोळीने पठाण यांच्यावर लाठ्याकाठ्या, रॉडने हल्ला केला. इम्रान व अफरोजचे पठाण यांच्या घरासमोरच दुकान आहे. सुरुवातीला त्यांनी दादांची मुले अफसर व जुबेर यांच्यावर हल्ला चढवला. त्यांच्या पत्नींनी दोघांना आत नेत कंपाऊंडच्या गेटला कुलूप लावले. त्या विनवण्या करत होत्या. तरीही हल्लेखोर कुलूप तोडण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी दादा पठाण यांना लक्ष्य केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री इम्रानला पोलिसांनी पकडले. तर अन्य हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लातूर! धाब्यावर चिकन अन् दारू पाजली अन् जाळून मारलं पण कानून के हात लंबे होते है…
महाराष्ट्र हादरला! कलाकेंद्रात कामाचं अन् पैशांचं आमिष दाखवलं, सामूहिक अत्याचार…
हृदयद्रावक! साताऱ्यात थरकाप उडवणारा अपघात; शिक्षिकेचा जागीच मृत्यू…
पुणे जिल्ह्यात विद्यार्थ्यांमध्ये गँगवॉर; मुलाची गळा चिरून हत्या…
हृदयद्रावक! बहिण-भावावर एकाचवेळी अंत्यसंस्कार, आई-वडिलांची भेट राहिली अधुरी…

